Jaipur-Mumbai Express Update : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, एएसआयला गोळी मारल्यानंतर एस 5 डब्यात गेला अन्…

| Updated on: Aug 05, 2023 | 12:41 PM

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली होती. यात एएसआयसह तीन प्रवाशांचा नाहक बळी गेला. या प्रकरणी रोज नवनवीन अपडेट समोर येत आहे.

Jaipur-Mumbai Express Update : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, एएसआयला गोळी मारल्यानंतर एस 5 डब्यात गेला अन्...
जयपूर-मुंबई एक्सप्रेस घोटाळा प्रकरणी नवीन अपडेट समोर
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई / 5 ऑगस्ट 2023 : जयपूर-मुंबई एक्स्प्रेस गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. घटनेच्या दिवशी काय घडलं याबाबत नवीन माहिती समोर आली आहे. रेल्वे पोलिसांच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चेतन सिंहने टिकाराम मीना यांच्यावर गोळीबार केल्यानंतर 20 मिनिटांनंतर आणखी एका प्रवाशावर गोळीबार केला. यानंतर आरोपी एक्स्प्रेसच्या एस 5 क्रमांकाच्या डब्यात गेला आणि तिथेही गोळीबार करणार होता. परंतु प्रवाशांनी गोंधळ घातला आणि आरोपी चेतन सिंग गोळीबार न करता तेथून परत गेला. आरोपी चेतन सिंग याने एसआय मीणा यांच्यासह 3 प्रवाशांना का गोळ्या घातल्या, याबाबत सस्पेंस अजूनही जीआरपीसमोर कायम आहे.

ट्रेनमधून उतरल्यानंतर पत्नीला फोन करुन म्हणाला…

एक्सप्रेसमध्ये गोळीबार झाल्यानंतर मीरा रोड ते दहिसर दरम्यान चैन पुलिंग झाल्यानंतर आरोपी चेतन सिंग ट्रेनमधून खाली उतरला. त्यानंतर त्याने पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली. तसेच माझ्या मुलांची काळजी घे असे सांगितले. आरोपीची मानसिक स्थिती ठीक आहे की नाही याचाही तपास करण्यात आला आहे. मात्र डॉक्टरांचा अंतिम अहवाल अद्याप जीआरपीला प्राप्त झालेला नाही. आरोपी चेतन अजूनही तपासात सहकार्य करत नाही. यामुळे आरोपी चेतन सिंगची नार्को चाचणी होऊ शकते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस चेतन सिंगची चौकशी करतात, तेव्हा तो तासनतास गप्प राहतो आणि फक्त त्यांच्याकडे पाहतो. काहीही उत्तर देत नाही. आरोपीचे हे वर्तन पाहता पोलीस आता चेतन सिंगची नार्को टेस्ट करण्याचा विचार करत आहेत.

हे सुद्धा वाचा