AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jaipur-Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरण, चौथ्या मृतदेहाची ओळख पटली !

जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफ कॉन्स्टेबलने गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत आरपीएफ एएसआयसह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला.

Jaipur-Mumbai Express Firing : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमधील गोळीबार प्रकरण, चौथ्या मृतदेहाची ओळख पटली !
जयपूर-मुंबई एक्सप्रेस गोळीबारातील चौथ्या मृतदेहाची ओळख पटलीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Aug 02, 2023 | 9:49 AM
Share

मुंबई / 2 ऑगस्ट 2023 : जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात आरपीएफच्या ASI सह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. यातील तिसऱ्या प्रवाशाचीही ओळख पटली आहे. तिसरा मयत प्रवासी हा हैदराबाद येथील रहिवासी आहे. सय्यद सैफुद्दीन तिसऱ्या मयत प्रवाशाचे नाव आहे. मृतक एमआयएमशी संबंधित असल्याची माहिती मिळते. सय्यदचे कुटुंबीय मुंबईत दाखल झाले असून, मृतदेह हैदराबादला नेण्यात येणार आहे. सय्यद हे अजमेर शरीफहून परतत होते. मात्र घरी पोहचण्याआधीच त्यांच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. अखेर तिसऱ्या प्रवाशाची ओळख पटवण्यास यश आले आहे.

अजमेर शरीफहून परतत होते

सय्यद यांचे कुटुंब मुळचे कर्नाटकातील बिदरमधील रहिवासी असून, कामानिमित्त ते गेल्या 15 वर्षांपासून हैदराबाद येथे राहतात. सय्यद यांचे हैदराबाद येथे मोबाईल दुरुस्तीचे दुकान आहे. ते राजस्थानमधील अजमेर शरीफ येथे गेले होते. तेथून जयपूर-मुंबई एक्सप्रेसने ते मुंबईकडे प्रवास करत होते. सय्यद यांना तीन मुली आहेत. सय्यद यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्या पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.

हा दहशतवादी हल्ला – वारीस पठाण

दरम्यान, सय्यद यांच्या तिन्ही मुलींना 25 लाख रुपये द्यावी अशी मागणी कुटुंबासह हैदराबादचे आमदार जाफर हुसेन यांनी केली आहे. तर हा दहशतवादी हल्ला आहे, आरोपीचे मोबाईल आणि गॅझेट तपासा अशी मागणी एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी केली आहे.

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.