मुंबईत किलर हॅटमॅनची दहशत, नेमके काय आहे प्रकरण?; पोलीस म्हणाले…

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीती वाढली आहे.

मुंबईत किलर हॅटमॅनची दहशत, नेमके काय आहे प्रकरण?; पोलीस म्हणाले...
मुंबईत किलर हॅटमॅनची दहशतImage Credit source: social
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 4:40 PM

मुंबई : मुंबईत सध्या किलर हॅटमॅनची दहशत पसरली आहे. या किलरने रात्री निर्जन रस्त्यावर एका महिलेची चाकूने हल्ला करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हत्येची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अंधेरी परिसरात ही घटना घडल्याची चर्चा आहे. हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे. मात्र या व्हिडिओबाबत मुंबई पोलिसांनी खुलासा केला आहे. मुंबईत अशी कोणत्याही महिलेची हत्या झाली नसून, व्हायरल व्हिडिओवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

काय म्हणाले मुंबई पोलीस?

अशा प्रकारचा कोणीही हॅटमन नाही आणि महिलेची हत्या केली नाही. अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही. अंधेरी परिसरात अशी घटना घडल्याचा दावा खोटा असल्याचे सांगत, हत्येची घटना मुंबई पोलिसांनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका निर्जन रस्त्यावर एक कार येऊन थांबते. या कारमधून एक महिला खाली उतरते. महिला उतरल्यानंतर कार निघून जाते. यानंतर महिला रस्ता ओलांडणार इतक्यात काळ्या कपड्यात टोपी घातलेला एक व्यक्ती मागून आला आणि त्याने महिलेची मान आवळली.

हे सुद्धा वाचा

एका हाताने मान आवळत त्याने महिलेवर चाकूहल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी होत रस्त्यावर पडली आणि तिचा मृ्त्यू झाला. यानंतर हल्लेखोर तिला ओढत फुटपाथवर आणतो.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. विशेषतः महिलांमध्ये भीती वाढली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी आता यावर स्पष्टीकरण दिले आहे की, अंधेरीमध्येच नाही तर कुठेही अशी घटना घडलेली नाही.

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.