AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Milk Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसणार, दूधच्या किमतीत पुन्हा वाढ होणार

मे महिन्यात दूधाच्या किमतीत एक-दोन रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा दूधाच्या किमतीत वाढ होऊ शकते असे चित्र पाहायला मिळत आहे. पाऊस जितका उशीर करेल तितक्या किमती वाढण्याची शक्यतेत अधिक भर पडेल.

Milk Price Hike: सर्वसामान्यांना महागाईचा चटका बसणार, दूधच्या किमतीत पुन्हा वाढ होणार
| Updated on: Jun 20, 2026 | 8:45 AM
Share

मे महिन्यात अमूल आणि मदर डेअरीसह, देशातील इतर डेअरीनेही दुधाचे भाव वाढवल्याची माहिती दिली होती. या किमतीमुळे सर्वसामान्य लोकांच्या बजेटमध्ये अडथळा निर्माण झाला. येत्या काही दिवसांत, दुधाच्या भावांचा सर्वसामान्य लोकांच्या बजेटवर पुन्हा एकदा परिणाम होऊ शकतो. डेअरी उद्योगातील अधिकाऱ्यांच्या मते, मे महिन्यात दुधाच्या भावात आधीच 2-3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जर एल निनो आणि कमी पावसामुळे चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आणि त्याचा दुग्ध उत्पादनावर परिणाम झाला, तर जुलै किंवा ऑगस्टपर्यंत भावात आणखी वाढ होऊ शकते. यामुळे मध्यमवर्गीयांना याचा अजून फटका बसणार असे पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे महिन्यांचे बजेट बिघडणार आहे. अमूल, मदर डेअरी आणि पराग मिल्क फूड्ससारख्या प्रमुख डेअरी कंपन्यांनी मे महिन्यात दुधाचे भाव 2-3 टक्क्यांनी वाढवले. दरम्यान, तामिळनाडूस्थित ‘आविन’ने उष्णतेच्या लाटेमुळे पुरवठा कमी केला आहे.

‘गो चीज’ आणि ‘गोवर्धन’ या ब्रँड्सची मालक असलेल्या पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शाह यांनी ‘ईटी’च्या एका वृत्तात म्हटले आहे की, दुधाच्या दरात आधीच सुमारे 2-3 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि जर प्रमुख दूध उत्पादक भागांमध्ये पाऊस सामान्यपेक्षा कमी राहिला, तर जुलैपर्यंत आणखी 3-4 टक्क्यांची वाढ होऊ शकते. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना चाऱ्याचे उत्पादन वाढवण्याचा सल्ला दिला आहे, तर अनेक डेअरी कंपन्या पशुपालकांसोबत चाऱ्याच्या योजनांवर काम करत आहेत.

महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन आयुक्त किरण पाटील म्हणाल्या की, “एल निनोमुळे चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीचा दूध उत्पादनावर परिणाम होऊ नये यासाठी. राज्यातील सर्व पशुपालकांनी सतर्क राहून आतापासून चारा पिकांचे नियोजन करावे.

अमूल आणि मदर डेअरीचे मत अमूलने ‘ईटी’च्या एका वृत्तात म्हटले आहे की, “मान्सूनच्या प्रगतीचे मूल्यांकन करतील आणि सध्या चाऱ्याची परिस्थिती चिंतेचे कारण नाही. अमूल ब्रँडची मालकी असलेल्या गुजरात कोऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन मॅनेजिंग डायरेक्टर जयेन मेहता म्हणाले की, एल निनोचा दुधाच्या उपलब्धतेवर कोणताही तात्काळ परिणाम झालेला नाही. कमी पावसाचा परिणाम सहसा संपूर्ण देशाऐवजी विशिष्ट भागांपुरता मर्यादित असतो.

मदर डेअरीने साांगितले की, “आम्ही आमच्या खरेदीचे क्षेत्रातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि जिथे आवश्यक आहे तिथे उपाययोजना करत आहेत. आम्ही आमच्या खरेदी नेटवर्कमधील राज्यनिहाय घडामोंडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि जिथे आवश्यक आहे तिथे योग्य उपाययोजना राबवत आहोत,” असे मदर डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक जयतीर्थ चारी म्हणाले.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला