AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Rape: मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, काेणत्या भागात घडली ही घटना?

आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते.

Mumbai Rape: मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, काेणत्या भागात घडली ही घटना?
विकृताकडून शवागृहातील मृतदेहांवर बलात्कारImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Dec 24, 2022 | 3:20 PM
Share

मुंबई, मुंबईच्या एनएम जोशी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape on Minor in Mumbai) झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करणयात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये 3 आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती समाेर आली आहे. पोलिसांनी अटक करून तीनही अल्पवयीन आरोपींना डोंगरी भागातील बालसुधारगृहात पाठवले आहे. एनएम जोशी मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 (डी) (2) (एन), 34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 5, 6, 8, 10, 12, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

ओळखीचा घेतला गैरफायदा

उर्वरित 3 प्रौढ आरोपींना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.  पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकाच परिसरातील असून ते एकमेकांच्या ओळखीचे होते. याच महिन्यात मुंबईतून आणखी एका महिलेसोबत सामुहीक बलात्कार झाल्याची बातमी समोर आली होती. येथे एका 42 वर्षीय महिलेवर अमानुषपणे अत्याचार करण्यात आला हाेता.  तिघांनी घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार केला हाेता. यादरम्यान आरोपींनी महिलेवर धारदार शस्त्राने वार केले आणि तिच्या प्रायव्हेट पार्टवर सिगारेटने चटकेही दिले हाेते.

उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र सर्वात असुरक्षित राज्य

नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्ड (NCRB) च्या 2018 ते 2020 च्या अहवालावर नजर टाकल्यास, बलात्कारानंतर खून आणि सामूहिक बलात्काराच्या बाबतीत महाराष्ट्र  क्रमांकावर आहे. 2018 ते 2020 मध्ये, महिलांवरील अत्याचाराचे 3,1954 प्रकरणे नोंदवण्यात आली. बलात्कारानंतर खून आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश 4,9385 आकडेवारीसह पहिल्या क्रमांकावर आहे.

Follow Us
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या