सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर-नर्सला मारहाण, रुग्णाच्या नातेवाईकांवर कारवाईसाठी डॉक्टरांचा कँडल मार्च

| Updated on: Jun 28, 2021 | 7:31 AM

65 वर्षीय प्यारेलाल गुप्ता उपचारासाठी सायन रुग्णालयात आले, त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी उपचार सुरु केले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चिडलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर-नर्सला मारहाण, रुग्णाच्या नातेवाईकांवर कारवाईसाठी डॉक्टरांचा कँडल मार्च
सायन रुग्णालयातील डॉक्टरांचा कँडल मार्च
Follow us on

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध सायन हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्सला रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा प्रकार नुकताच समोर आला होता. या मारहाणीचा डॉक्टरांनी कँडल मार्च काढत निषेध व्यक्त केला. रविवारी रात्री सायन हॉस्पिटल परिसरात मेणबत्ती हातात धरुन मार्च काढत डॉक्टरांनी आरोपींवर कारवाईची मागणी केली. अन्यथा संपावर जाण्याचा इशाराही मोर्चात सहभागी डॉक्टरांनी दिला. (Mumbai Sion Hospital Doctor Nurse beaten up by Patients Relatives protest through Candle March)

नेमकं काय घडलं

लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय अर्थात सायन हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी रात्री एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यामुळे रुग्णाच्या संतप्त नातेवाईकांनी डॉक्टर आणि नर्स यांना बेदम मारहाण केली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 65 वर्षीय प्यारेलाल गुप्ता उपचारासाठी रुग्णालयात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी उपचार सुरु केले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चिडलेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांसोबत मारहाण केल्याचा आरोप आहे.

गुन्हा दाखल, कारवाई नाही

या प्रकरणातील रुग्णाच्या आरोपी नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरीही अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही, असा दावा डॉक्टरांनी केला आहे. आरोपींवर कायदेशीर कारवाई केली नाही, तर सर्व डॉक्टर संपावर जाण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

लातुरातही डॉक्टरांना टोळक्याची मारहाण

दरम्यान, लातूर शहरातील सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दहा ते बारा जणांनी धुडगूस घालत डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळेच आमचा रुग्ण दगावला, असा आरोप करत टोळक्याने डॉक्टरांना मारहाण केली होती. याप्रकरणी मारहाण  करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

संबंधित बातम्या :

लातूरच्या रुग्णालयात 10 ते 12 जणांचा धुडगूस, डॉक्टरांना मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

मद्यधुंद रुग्णासह चौघांचे महिला-पुरुष डॉक्टरांशी असभ्य वर्तन, केबिनची तोडफोड

(Mumbai Sion Hospital Doctor Nurse beaten up by Patients Relatives protest through Candle March)