लातूरच्या रुग्णालयात 10 ते 12 जणांचा धुडगूस, डॉक्टरांना मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

शहरातील सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काल रात्री दहा ते बारा जणांनी धुडगूस घालत डॉक्टरांना मारहाण केली आहे. (Super Speciality hospital in Latur 10 to 12 people beat up a doctor)

लातूरच्या रुग्णालयात 10 ते 12 जणांचा धुडगूस, डॉक्टरांना मारहाण, पोलिसांत गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
लातूर शहरातील सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काल (शनिवार) रात्री दहा ते बारा जणांनी धुडगूस घालत डॉक्टरांना मारहाण केली आहे.


लातूर : शहरातील सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काल (शनिवार) रात्री दहा ते बारा जणांनी धुडगूस घालत डॉक्टरांना मारहाण केली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमचा रुग्ण दगावला, असा आरोप करीत डॉक्टरांना टोळक्याने मारहाण केली याप्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर लातूरच्या गांधी चौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Super Speciality hospital in Latur 10 to 12 people beat up a doctor)

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच रुग्ण दगावल्याचा आरोप करत मारहाण

कोविड सदृश्य आजाराने रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर दहा ते बारा नातेवाईक रात्री दहा नंतर हॉस्पिटलमध्ये जमा झाले आणि त्यांनी डॉक्टरांशी वाद घालायला सुरुवात केली. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच आमचा रुग्ण दगावला असा आरोप करीत डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. वेळीच हॉस्पिटलच्या सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करीत मारहाण करणाऱ्या लोकांना बाहेर काढले.

मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. रुग्ण मृत झाल्याचे कारण सांगून या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवला होता. मारहाण करणाऱ्यांवर लातूरच्या गांधी चौक पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

(Super Speciality hospital in Latur 10 to 12 people beat up a doctor)

पाहा व्हिडीओ :

हे ही वाचा :

जीवनाच्या परीक्षेत अधिक काळ टिकू शकत नाही, व्हिडीओ पोस्ट करत लातुरात तरुणीची आत्महत्या

नवरा म्हणाला, ‘वांग्याची भाजी दे’, बायको म्हणाली, ‘संपलीय’, चिडलेल्या नवऱ्याने रॉकेल टाकून पत्नीला पेटवलं

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI