Cyber Crime: मुंबईत बसून अमेरिकन व्यक्तीची चार कोटींत फसवणूक…FBI च्या इनपुटनंतर CBI ची अ‍ॅक्शन

Mumbai Crime News: आरोपी विष्णु राठी याने जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान अमेरिकन नागरिकाच्या संगणकावर आणि बँक खात्याचे अनधिकृत रिमोट ऍक्सेस मिळवले. त्यानंतर तांत्रिक मदतीच्या नावाखाली आरोपींनी सिस्टीम हॅक करून बँकेच्या पैसा त्याच्या नावावर वळवला.

Cyber Crime: मुंबईत बसून अमेरिकन व्यक्तीची चार कोटींत फसवणूक...FBI च्या इनपुटनंतर CBI ची अ‍ॅक्शन
cyber crime
Follow us
| Updated on: Sep 15, 2024 | 11:16 AM

ऑनलाईनच्या युगात सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भारतातील सर्वसामान्यांची फसवणूक करणारे अनेक सायबर भामटे आहेत. त्यासंदर्भात बातम्या येत असतात. परंतु मुंबईत बसून अमेरिकन लोकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पदार्फास करण्यात आला आहे. अमेरिकन तपास संस्था एफबीआयने यासंदर्भात केन्द्रीय अन्वेषण ब्यूरोला (सीबीआय) इनपूट दिले. त्यानंतर सीबीआयने मुंबईत सात ठिकाणी छापेमारी करत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचे नाव विष्णु राठी आहे.

विष्णू राठी याने स्वत:ला तांत्रिक सहायक असल्याचे सांगून एका अमेरिकन व्यक्तीची 4.5 लाख अमेरिकी डॉलरची (तीन कोटी 77 लाख रुपये) फसवणूक केली आहे. यासंदर्भात फेडरल ब्यूरो ऑफ इन्वेस्टिगेशन म्हणजेच एफबीआयने इनपूट दिले होते.

असा ऐवज जप्त

सायबर गुन्हेगाराविरोधात ‘ऑपरेशन चक्र 3’ सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर एफबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलियन-समर्थित सायबर गुन्हेगारीचे नेटवर्क उद्ध्वस्त केले गेले आहे. 2022 पासून परदेशात राहणाऱ्या लोकांना हे नेटवर्क लक्ष्य करत होते. गेल्या दोन दिवसांत सात ठिकाणी टाकलेल्या छाप्यात विष्णू राठी नावाच्या सायबर गुन्हेगाराला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 100 ग्रॅमचे 57 सोन्याचे बार, 16 लाख रुपये रोख, मोबाईल फोन, क्रिप्टो करन्सीसाठी वापरलेला लॅपटॉप, लॉकरचे तपशील आणि इतर कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय सायबर आर्थिक गुन्हे नेटवर्क व्हर्चअल मालमत्ता आणि बुलियनद्वारे चालवले जात होते.

हे सुद्धा वाचा

काय आहे आरोप

आरोपी विष्णु राठी याने जून ते ऑगस्ट 2022 दरम्यान अमेरिकन नागरिकाच्या संगणकावर आणि बँक खात्याचे अनधिकृत रिमोट ऍक्सेस मिळवले. त्यानंतर तांत्रिक मदतीच्या नावाखाली आरोपींनी सिस्टीम हॅक करून बँकेच्या पैसा त्याच्या नावावर वळवला. अमेरिकन व्यक्तीला राठी याने त्यांच्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये US$453,953 हस्तांतरित करण्यास सांगितले होते. आरोपीने ही रक्कम त्याच्या क्रिप्टोकरन्सी वॉलेटमध्ये ट्रान्सफर करून फसवणूक केली.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.