सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात का झाला? कारण शोधून काढण्यासाठी पोलीस करणार ‘असा’ तपास

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी भीषण कार अपघातात मृत्यू झाला. ते अहमदाबादहून मुंबईकडे परतत होते. तेव्हा पालघरजवळ त्याच्या कारचा अपघात झाला. एका मर्सिडीज कारने ते प्रवास करत होते.

सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात का झाला? कारण शोधून काढण्यासाठी पोलीस करणार 'असा' तपास
सायरस मिस्त्री आणि त्यांची अपघातग्रस्त कारImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 6:28 AM

मुंबई : सायरस मिस्त्री (Cyrus Mistry Accident News) अपघातप्रकरणी मोठी अपडेट हाती येते आहे. सायरस मिस्त्री यांचा रविवारी (4 ऑगस्ट) कार अपघातात मृत्यू झाला. या अपघातानंतर आता पोलीसांकडून अपघाताची चौकशी केली जाते आहे. अपघाताच्या मुळाशी जात, नेमकं अपघाताचं कारण काय होतं?, याचा तपास पोलिसांकडून (Police investigation) केला जाणार आहे. याच तपासासाठी पोलिसांकडून एनजीओची मदत घेतली जाणार आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा अभ्यास करणाऱ्या एनजीओच्या मदतीने पोलीस पुढील तपास करणार आहेत. यात सीसीटीव्ही फुटेज (Cyrus Mistry car accident CCTV Video), कार चालकाची चौकशी इतर बाबीही तपासल्या जातील.

विशेष एनजीओची मदत

महामार्गावर होणाऱ्या अपघातांचा विशेष एनजीओच्या मदतीने सखोल अभ्यास केला जातो. यात अपघाताचं कारण तर शोधलं जातंच. शिवाय पुन्हा असा अपघात होणार नाही, यासाठी काय करायला हवं, यावरही भर दिला जातो. आता पोलिसांकडून या एनजीओच्या मदतीने अपघाताच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यातून या अपघाताचं मूळ कारण काय, याचा शोघ घेतला जाईल.

हे सुद्धा वाचा

आजपासून तपासाला सुरुवात

एक एनजीओतील तज्ज्ञ मंडळी पोलिसांसमोर या तपासात आजपासून सहभागी होतील. पोलिस आणि एनजीओतील लोक मिळून सायरस मिस्त्री यांच्या कार अपघाताची चौकशी आणि अभ्यास करतील. या चौकशीदरम्यान वेगवेगळ्या पैलूंवर अभ्यास केला जाणार आहे. कारचा अपघात का झाला, कसा झाला, अपघातात नेमकी चूक कुणाची होती? हा अपघात टाळता येणं शक्य होतं की नव्हतं?, अशा पैलूंवर तपास केला जाईल.

रस्ते अपघातांची चिंता

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा रविवारी भीषण कार अपघातात मृत्यू झाला. ते अहमदाबादहून मुंबईकडे परतत होते. तेव्हा पालघरजवळ त्याच्या कारचा अपघात झाला. एका मर्सिडीज कारने ते प्रवास करत होते. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील चार जणांपेकी दोघांचा मृत्यू झालास तर दोघेजण गंभीर जखमी झाले. सध्या अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. सायरस मिस्त्री यांच्या अपघातामुळे रस्ते अपघातांत होणाऱ्या मृत्यूच्या घटनांना प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वीच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचाही कार अपघातात मृत्यू झाला होता. पहाटेच्या सुमारास विनायक मेटे यांची कार मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर अपघातग्रस्त झाली होती.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.