AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा झटका! आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

Anil Ambani Reliance: अनिल अंबानी यांना एकामागून एक मोठे झटके बसले आहेत. त्यांच्यामागे यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लावला आहे. त्यातच आता येस बँक घोटाळा प्रकरणात त्यांची ११२० कोटींची मालमत्ता जप्त करम्यात आली आहे. आतापर्यंत त्यांची 10 हजार 117 कोटींच्या मालमत्तेवर टाच आली आहे.

Anil Ambani: अनिल अंबानींना मोठा झटका! आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त
अनिल अंबानी
| Edited By: | Updated on: Dec 07, 2025 | 12:35 PM
Share

Enforcement Directorate Seized 1120 crores Assets: रिलायन्सचे अनिल अंबानी यांच्यावर संकटाची मालिका सुरूच आहे. यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा त्यांच्या पाठीशी असतानाच त्यांच्या मालमत्ता ही जप्त करण्यात येत असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम फायनान्स आणि रिलायन्स कमर्शिअल फायनान्स या रिलायन्स अनिल अंबानी समुहाशी संबंधीत १८ मालमत्तांवर टाच आली आहे. सक्तवसुली संचालनालयाने या संस्थांशी संबंधित मुदत ठेवी, बँकेतील रोकड आणि विविध कंपन्यांतील समभाग अशी एकूण ११२० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.

अनिल अंबानींनीसह इतरांवर गुन्हा

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने R Com, अनिल अंबानी आणि इतरांवर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. संचालनालय सुद्धा याप्रकरणी चौकशी करत आहे. या जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.च्या अंधेरीतील व्यावसायिक इमारतींसह बॅलार्ड इस्टेट येथील रिलायन्स सेंटर, सांताक्रूझ येथील आलिशान सदनिका, अतिथीगृह अशा सात, रिलायन्स पॉवर लि. च्या दोन, रिलायन्स व्हॅल्यू सर्व्हिस प्रा. लि.चे चेन्नई येथील २३१ भूखंड तसेच सात सदनिका अशा नऊ मालमत्तांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

याअगोदर ८ हजार ९९७ रुपयांची मालमत्ता जप्त

मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाने यापूर्वी रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स कमर्शिअल फायनान्स, रिलायन्स होम फायनान्स या कंपन्यांतील घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. त्यानुसार या संस्थांच्या ८ हजार ९९७ कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यात आली. या सर्व घोटाळ्यातील जप्त मालमत्ता १० हजार ११७ कोटी इतकी झाली आहे. रिलायन्स समुहावर अनेक दिवसांपासून चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअरवर सुद्धा मोठा परिणाम दिसून आला. कधीकाळी सर्वोच्च उच्चांकावर असलेले शेअर एकदम रसातळाला आले आहेत. त्यात थोडीबहुत उसळी दिसली. पण या नवीन कारवाईमुळे शेअरमध्ये पुन्हा घसरण दिसली. रिलायन्सच्या कंपन्यांवरील कर्ज कमी झाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत असतानाच नवीन धडाधड कारवाईमुळे गुंतवणूकदारही धास्तावले आहेत.

Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?