Mumbai Train Firing : संपूर्ण बोगीत रक्तच रक्त… ASI साहेबांचा मृतदेह पडलेला… प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये आज गोळीबार झाल्या नंतर ही ट्रेन मीरारोड-दहिसर दरम्यान थांबवण्यात आली होती. या घटनेनंतर विरार-चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं.

Mumbai Train Firing : संपूर्ण बोगीत रक्तच रक्त...  ASI साहेबांचा मृतदेह पडलेला... प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव
जयपूर-मुंबई एक्सप्रेस घोटाळा प्रकरणी नवीन अपडेट समोरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 10:14 AM

विजय गायकवाड, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पालघर | 31 जुलै 2023 : जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये एका आरपीएफ कॉन्स्टेबलने अंधाधूंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका आरपीएफ कॉन्स्टेबलसह चौघांचा मृत्यू झाला आहे. माथेफिरू कॉन्स्टेबलमुळे हकनाक चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी कॉन्स्टेबल चेतनला अटक केली आहे. त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. त्याने गोळीबार का केला? त्यामागचं कारण काय? नेमकं काय घडलं होतं? प्रवाशांवर गोळ्या का झाडल्या? असे सवाल त्याला करण्यात येणार आहेत. त्याच्या चौकशीतून या गोळीबाराचं नेमकं कारण समजणार आहे.

आज सकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये हा गोळीबार झाला. कॉन्स्टेबल चेतन याने चौघांवर गोळ्या झाडल्या असून त्यात या चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यात आरपीएफचा एएसआय टीका राम याचा मृत्यू झाला आहे. टीका राम हा राजस्थानचा रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

एका पाठोपाठ धाड धाड गोळीबाराचा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी गोंगाट सुरू करताच आरोपी चेतनने दहिसरमध्ये चालत्या ट्रेनमधून उडी मारली. तर प्रवाशांनी तात्काळ बोगीत जाऊन पाहिलं आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर आम्ही गोळीबाराच्या आवाजाच्या दिशेने धावलो. एएसआय साहेब मरून पडलेले होते. त्यांच्या बाजूला तीन प्रवाशांचे मृतहेदही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्या बोगीत सर्वत्र रक्तच रक्त होते. हे पाहून आम्हाला धक्काच बसला, असं एका प्रवाशाने सांगितलं.

आम्ही झोपेत होतो

हा गोळीबार झाला तेव्हा आम्ही झोपेत होतो. असं काही होईल आम्हाला माहीत नव्हतं. गोळीबाराचा आवाज झाल्याने आमची झोप उडाली. लोक किंचाळत होते. त्यामुळे आवाजाच्या दिशेने आम्ही धावलो, असंही या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितलं. ही गोळीबाराची घटना ट्रेन क्रमांक 12956च्या बोगीनंबर B-5 मध्ये ही घटना घडली.

बोगी सील, तपास सुरू

दरम्यान, आरोपी चेतनला बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच जयपूर-मुंबई पॅसेंजर मुंबई सेंट्रलला नेण्यात आली. या ठिकाणी गेल्या दीड तासापासून ही पॅसेंजर मुंबई सेंट्रल स्थानकावर उभी आहे. या पॅसेंजरची B-5 ही बोगी सील करण्यात आली आहे. फॉरेन्सिक टीमचे अधिकारी घटनास्थळी येऊ या बोगीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ही बोगी कारशेडला नेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोळीबाराच्या घटनेनंतर बोरिवली स्थानकावर चारही मृतदेह उतरवण्यात आले होते. त्यानंतर हे मृतदेह शवविच्छेदनासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोस्टमार्टेम अहवालानंतर अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल लेट

जयपूर-मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये आज गोळीबार झाल्या नंतर ही ट्रेन मीरारोड-दहिसर दरम्यान थांबवण्यात आली होती. या घटनेनंतर विरार-चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. 15 ते 20 मिनिटे उशिराने या लोकल धावत आहेत. त्यामुळे सकाळी सकाली कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहे. लोकल उशिराने धावत असल्याने प्रत्येक स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.