AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोळीबार करून आरोपीची धावत्या ट्रेनमधून उडी, जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये नेमकं काय घडलं?; वाचा 6 मोठ्या अपडेट्स

आज पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी ही धक्कादायक घटना घडली. आरपीएफचा कॉन्स्टेबल चेतन याने हा गोळीबार केला. ही घटना बोगी नंबर बी-5मध्ये त्याने अंधाधूंद गोळीबार केला.

गोळीबार करून आरोपीची धावत्या ट्रेनमधून उडी, जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये नेमकं काय घडलं?; वाचा 6 मोठ्या अपडेट्स
RPF constableImage Credit source: RPF constable
| Edited By: | Updated on: Jul 31, 2023 | 9:53 AM
Share

पालघर | 31 जुलै 2023 : दहिसर आणि मीरा रोड दरम्यान जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये गोळीबार झाला आहे. या गोळीबारात एका पोलिसासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी ही घटना घडली. चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याने प्रवाशी चांगलेच हादरून गेले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा प्रकार घडत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

आज पहाटे 5 वाजून 23 मिनिटांनी ही धक्कादायक घटना घडली. आरपीएफचा कॉन्स्टेबल चेतन याने हा गोळीबार केला. ही घटना बोगी नंबर बी-5मध्ये त्याने अंधाधूंद गोळीबार केला. चेतन हा एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता. गोळीबार केल्यानंतर त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. तो दहिसरच्या दिशेने पळून जात होता. मात्र, मीरा रोड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

गोळीबाराचे सहा अपडेट्स

1- कोणत्या ट्रेनमध्ये फायरिंग झाली?

– जयपूर एक्सप्रेस ट्रेन (12956)च्या बी-5 बोगीत ही घटना घडली. ही ट्रेन जयपूरहून मुंबईला येत होती.

2. गोळीबार कधी झाला?

– ही एक्सप्रेस पालघर स्थानकाच्या काही अंतरावर असतानाच ही घटना घढली. सकाळी 5 वाजून 23 मिनिटांनी हा गोळीबार झाला. वापी ते मीरा रोड स्टेनशच्या दरम्यान आरपीएफ जवानाने अचानक चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

3. कुणा कुणाचा मृत्यू झाला?

– या अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यात आरपीएफ जवान टीका राम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टीका राम हे एस्कॉर्टचे प्रभारी होते.

4. फायरिंग करणारा कोण?

– चेतन असं गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे. तो आरपीएफचा कॉन्स्टेबल होता. चेतन एस्कॉर्ट ड्यूटीवर तैनात होता. गोळीबार केल्यानंतर त्याने धावत्या ट्रेनमध्ये उडी मारली. त्याला मीरा रोड आणि बोरिवलीच्या दरम्यान अटक केली. त्याच्याजवळी शस्त्र जप्त करण्यात आले आहेत.

5. गोळीबार का झाला?

– चेतन आणि टीका राम यांच्यात वाद झाल्याने हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, नेमकं कारण समोर आलं नाही. आरपीएफ या घटनेची चौकशी करत आहे.

6. रेल्वेने काय सांगितलं?

– पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पालघर स्टेशन सोडल्यनंतर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार केला. त्यात दुसऱ्या आरपीएफ जवानासहीत आणखी तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो दहिसरमध्ये धावत्या ट्रेनमधून उडी मारून पळाला. मात्र, त्याला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.