सचिन वाझे आणि परमबीर सिंह क्रिकेट बुकींकडून खंडणी उकळायचे, मुंबई पोलिसांचा दावा

Mumbai Police | एनआयएने चौकशी केल्यानंतर वाझेची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. यानंतर सचिन वाझेला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे ब्रँचने एका खंडणी वसुली प्रकरणात ताबा मागितल्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझेला तळोजा जेलमधून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते.

सचिन वाझे आणि परमबीर सिंह क्रिकेट बुकींकडून खंडणी उकळायचे, मुंबई पोलिसांचा दावा
सचिन वाझे
| Edited By: | Updated on: Nov 07, 2021 | 7:57 AM

मुंबई: सचिन वाझे आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे दोघेजण क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या बुकींकडून खंडणी वसूल करत होते, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिली. पैसे न दिल्यास अटक करु, अशी धमकी या दोघांकडून बुकींना दिली जात असल्याची माहिती चौकशीदरम्यान पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बराच काळ राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझेला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांच्या हवाली करण्यात आले होते. गोरेगाव खंडणी प्रकरणात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सचिन वाझेची कोठडी मागितली होती. मात्र, सचिन वाझेची चौकशी करण्यासाठी आणखी काही दिवस हवे आहेत. त्यामुळे त्याची कोठडी वाढवून द्यावी, अशी मागणी गुन्हे शाखेने केली होती. न्यायालयाने शनिवारी ही मागणी मान्य करत सचिन वाझेच्या कोठडीला मुदतवाढ दिली.

एनआयएने चौकशी केल्यानंतर वाझेची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली. यानंतर सचिन वाझेला तळोजा जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे ब्रँचने एका खंडणी वसुली प्रकरणात ताबा मागितल्यामुळे न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाझेला तळोजा जेलमधून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. क्राइम ब्रँचने खंडणी वसुली प्रकरणात वाझेला कोर्टात हजर केले. कोर्टाने वाझेला पोलीस कोठडी दिली.

काय आहे प्रकरण?

गोरेगाव येथील बांधकाम व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्या तक्रारीवरुन, पोलिसांनी परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे, सुमित सिंह उर्फ चिंटू, अल्पेश पटेल, विनय सिंह उर्फ बबलू आणि रियाज भाटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सध्या मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे आहे.

संबंधित बातम्या:

तुझ्या सेल्फीच्या चरबीमुळे डील फसली, सुनील पाटील केपी गोसावीवर भडकला; विजय पगारेंचा दावा

अंबानींच्या घराबाहेरील ‘ती’ पांढरी इनोव्हा मुंबई पोलिसांची; सूत्रांची खळबळजनक माहिती

सचिन वाझेला सेवेत रुजू करण्याचा निर्णय झालेल्या बैठकीची माहिती द्या, मुंबई पोलीस म्हणतात…