AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कल्पनांच्या पलीकडे निघाला भामटा, उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरात 12 तोळे दागिन्यांची चोरी करणारा कोण होता?

उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरातून तब्बल 12 तोळे सोन्याचे दागिने चोरी झाले आहेत. विशेष म्हणजे चोरी करणारा भामटा हा कोण होता? याबाबतची माहिती समोर आल्यानंतर सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी दागिन्यांसह मंदिरातील सीसीटीव्ही आणि डीव्हिआर घेऊन फरार झाला झालाय.

कल्पनांच्या पलीकडे निघाला भामटा, उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरात 12 तोळे दागिन्यांची चोरी करणारा कोण होता?
उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरात 12 तोळे दागिन्यांची चोरी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 26, 2024 | 3:42 PM
Share

उल्हासनगरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपण जिथे सकारात्मक ऊर्जा घेण्यासाठी जातो, चांगल्या कामाची सुरुवात करण्याआधी जिथे आशीर्वाद घेण्यासाठी जातो, ज्या देवाकडे नतमस्तक होतो, अशा देवळात दागिन्यांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे चोरी करणारा हा बाहेरचा दुसरा तिसरा कुणी नसून मंदिराचा सुरक्षा रक्षकच असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कुंपनानेच शेत खाल्लं असा प्रकार आता समोर येताना दिसत आहे. याप्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात? ते पाहणं महत्त्वाचं आहे. पण आरोपीने जे कृत्य केलं ते ऐकून नियमित देवळात येणाऱ्या भाविकांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरात संबंधित घटना घडली आहे. या मंदिरात तीन दिवसांपूर्वीच एक भामटा सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीसाठी रुजू झाला होता. पण त्याने संधी साधत त्याच्या साथीदाराच्या मदतीने मंदिरातील दागिन्यांची चोरी केली आहे. आरोपीने मंदिरातील देवीच्या अंगावरील 12 तोळे दागिन्यांची चोरी केल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. संबंधित चोरीची घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील कुर्ला कॅम्प परिसरात प्रसिद्ध कालीमाता मंदिर आहे. या मंदिरात तीन दिवसांपूर्वी रमेश थापा उर्फ रमेश रावल हा तरुण सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला लागला होता. दरम्यान आज पहाटे तीन वाजताच्या सुमारास रमेशने आपल्या साथीदाराच्या मदतीने कालीमाता मंदिरातील देवीच्या अंगावर असलेले जवळपास 12 तोळे दागिने चोरून पळ काढला. या घटनेची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.

बदलापुरात अडीज लाखांची चोरी

दरम्यान, बदलापूरमध्ये देखील चोरीची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील श्रीराम वडापाव सेंटर येथे अडीच लाखांची चोरी झालीय. बदलापूर पश्चिम मधील श्रीराम वडापाव सेंटरमध्ये रात्री पावणे तीनच्या सुमारास शटर उचकून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना तिथे लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. अज्ञात चोरट्याने गल्ल्यात असलेले अडीच लाख रुपये रोकड लंपास केले असून या अज्ञात चोरट्या विरोधात बदलापूर पोलीस ठाणे पश्चिम येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बदलापूर पोलीस करत आहे.

Follow Us
दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
CM Devendra Fadnavis : दिवाळीआधी शेतकऱ्यांना दिलासा, खात्यांत 5 हजार रुपये जमा; मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहीर केले महत्त्वाचे आकडे
शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश.....
Sharad Pawar : शरद पवारांना डिस्चार्ज मिळताच मोदींचा फोन; सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, तुम्ही ठणठणीत राहा
बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला...
Beed : बीडच्या शृंगेरी घाटात भीषण अपघात; ट्रक दरीत कोसळून पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र...
Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपची अखेर चौकशी सुरू; विशेष समितीचं पत्र, जरांगे पुरावे देणार
महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप....
Mahayuti : महायुतीत नाराजीनाट्य सुरूच; भाजपने शिवसेनेला डावलल्याचा आरोप, शीतल म्हात्रेंची पोस्ट चर्चेत
पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात
Pune Payal Zabare : पायल झांबरे प्रकरणात मोठी कारवाई; फरार सासू-सासरे पोलिसांच्या ताब्यात, पतीनंतर दोघांनाही अटक
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर! मित्रपक्षांविरोधात आमदार...
राष्ट्रवादीत अंतर्गत नाराजीचा सूर? मित्रपक्षांविरोधात आमदारांच्या तक्रारी, बैठकीत नेमकं काय घडलं?
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंचा मोठा निर्णय! यंदा शिवाजी पार्कचा दीपोत्सव रद्द
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत
भारतीय जनता पक्षाविरुद्ध देशात तिरस्कार निर्माण झालाय आता... संजय राऊत आक्रमक
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ...
व्हायरल व्हिडिओवर श्यामकुमार बर्वेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'तो केवळ थट्टा-मस्करीचा भाग, नेमकी भानगड काय?