AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane : CCTV मध्ये दिसलं, धावत्या रिक्षात तरुणीसोबत नको ते कृत्य करणारा नराधम कोण?

ठाण्यात मुलींच्या सुरक्षेवरच सवाल उपस्थित करणारी संतापजनक घटना! आरोपीला अटक, CCTV मध्ये काय दिसलं?

Thane : CCTV मध्ये दिसलं, धावत्या रिक्षात तरुणीसोबत नको ते कृत्य करणारा नराधम कोण?
संतापजनक घटनाImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Oct 15, 2022 | 12:32 PM
Share

गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे : शुक्रवारी सकाळी ठाण्यात (Thane Crime News) एका तरुणीचा रिक्षा चालकाने (Auto Rikshaw Driver) विनयभंग केला. या संतापजनक घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही (CCTV Video) समोर आलं होतं. अखेर या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपी रिक्षा चालकाला अटक केलीय. नवी मुंबईतून पोलिसांनी रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्यात. सोबतच त्याची रिक्षा देखील जप्त करण्यात आली.

ठाणे नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका रिक्षा चालकाने कॉलेजात जात असलेल्या तरुणाचा हात धरला. त्यानंतर तिला धावत्या रिक्षासोबत फरफटतही नेलं. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पीडित तरुणीची छेडछाड काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुणीनेही स्वतःचा बचाव करणयाचा प्रयत्न केला. रिक्षात बसलेल्या रिक्षा चालकाची कॉलर धरुन त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करताना तरुणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलीय.

पण नेमक्या याच वेळी रिक्षा चालकाने रिक्षा सुरु केली आणि तरुणाल फरफटत नेलं. या झटापटीत तरुणी खाली पडली आणि त्यानंतर रिक्षा चालकाने पोबारा केला होता. रस्त्याच्या जवळच असलेले इतर नागरीक या तरुणीच्या मदतीला धावून आले होते.

पाहा व्हिडीओ :

अखेर अटक

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार अखेर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी रिक्षा चालक मूळचा आंध्र प्रदेशचा असल्याची माहिती समोर आलीय. राजू उर्फ कटिकादला आब्बाथी बिरांगनेलू असं या रिक्षा चालक आरोपीचं नाव आहे. रात्री उशिरा नवी मुंबईतील दिघा परिसरातून आरोपीला पोलिसांनी अटक केली.

ठाणे नगर पोलिसांनी आरोपीला अटक करण्यासाठी चार पथकं तैनात केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी रिक्षाचा नंबर आणि इतर माहिती गोळी केली. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. भाजपचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनीही या मुलीसोबत घडलेल्या प्रकाराचा पाठपुरावा करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.