AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CCTV : ठाण्यात मुली असुरक्षित, रिक्षा चालकाच्या छेडछाडीला तरुणीने विरोध केला, पण अखेर…

पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला तरुणीने पकडण्याचा प्रयत्न केला. रिक्षात बसलेल्या रिक्षाचालकाची कॉलर धरुन त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला.

CCTV : ठाण्यात मुली असुरक्षित, रिक्षा चालकाच्या छेडछाडीला तरुणीने विरोध केला, पण अखेर...
रिक्षा चालकाकडून तरुणीचा विनयभंगImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Oct 14, 2022 | 8:06 PM
Share

गणेश जाधव, TV9 मराठी, ठाणे : ठाणे स्टेशन रोड परिसरात विनयभंगाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छेडछाडीला विरोध (Oppose to Molestation) करणाऱ्या तरुणीला मुजोर रिक्षाचालकाने चक्क रिक्षासह फरफटत नेल्याची घटना ठाण्यात आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद (Incident Caught in CCTV) झाली आहे. या घटनेत तरुणी जखमी (Girl Injured) झाली आहे. रिक्षा चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

पीडित तरुणी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होती. यावेळी हा रिक्षाचालक तिथे आला आणि त्याने तरुणीला इशारे करत तिची छेडछाड काढली. तरुणीने त्याला विरोध केला असता त्याने त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला तरुणीने पकडण्याचा प्रयत्न केला. रिक्षात बसलेल्या रिक्षाचालकाची कॉलर धरुन त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा सुरु करत तरुणीला फरफटत नेले.

घटनेनंतर रिक्षाचालकाचा पोबारा

काही वेळ फरफटत गेल्यानंतर तरुणी खाली पडली. यानंतर रिक्षाचालकाने पोबारा केला. या घटनेत तरुणी जखमी झाली असून, काही वेळ रस्त्यावरच पडून होती. काही नागरिकांनी त्या महिलेला उचलून बाजूला केलं.

या प्रकरणी रिक्षावाल्यालाविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात छेडछाड आणि विनयभंग असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे नगर पोलीस आरोपी रिक्षावाल्याचा शोध घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक यांनी देखील याबाबत पोलिसात धाव घेऊन मुलींला पाठिंबा दिला आहे. तसेच अनेक तक्रारी करून देखील प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक विभाग कोणतीही दखल घेत नसल्यामुळे अशा मुजोर रिक्षावाल्यांना कधी धडा शिकवणार असा सवाल वाघुलेंनी केला आहे.

Follow Us
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर