Mumbai Theft : चित्रपट व्यावसायिकाच्या घरी लाखोंची चोरी,पोलिसांच्या सतर्कतेमुळे 48 तासाच्या आत चोरटे जेरबंद

चित्रपट व्यावसायिक संतोष रविशंकर गुप्ता यांच्या गोरेगाव पश्चिमेतील धीरज रेसिडन्सीमधील राहत्या घरी 8 जानेवारी रोजी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती घुसले.

Mumbai Theft : चित्रपट व्यावसायिकाच्या घरी लाखोंची चोरी,पोलिसांच्या सतर्कतेमुळे 48 तासाच्या आत चोरटे जेरबंद
चित्रपट व्यावसायिकाच्या घरी चोरी करणाे तिघे अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jan 11, 2023 | 7:44 PM

मुंबई : नोकराला बांधून ठेवत आणि हत्याराचा धाक दाखवून तिजोरी चाव्या काढून घेत फिल्मी स्टाईलने चित्रपट व्यावसायिकाच्या घरी 40 लाखाची चोरी केल्याची घटना गोरेगावमध्ये घडली. मात्र बांगुर नगर पोलिसांनी 48 तासाच्या आत तिन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींकडून रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. मुस्तकीम उर्फ सोहेल रहीम शेख, देवेश प्रेमचंद सावरिया आणि सर्वेश कल्लू शर्मा अशी अटक करण्यात आरोपींची नावे आहेत.

नोकर घरी एकटा असताना अज्ञात व्यक्ती घरी घुसले

चित्रपट व्यावसायिक संतोष रविशंकर गुप्ता यांच्या गोरेगाव पश्चिमेतील धीरज रेसिडन्सीमधील राहत्या घरी 8 जानेवारी रोजी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्ती घुसले. यावेळी गुप्ता यांचा नोकर विकास चौधरी हा एकटाच होता.

40 लाखाच्या रोकडसह 12 ग्रॅम सोने लुटले

नोकराने दरवाजा उघडताच आरोपींनी त्याला बंदुकीचा धाक दाखवत त्याच्याकडील तिजोरीची चावी कढून घेतली. त्यानंतर नोकराचे हातपाय बांधून तिजोरीतील 40 लाख 9 हजार रुपयांची रोकड आणि 12 ग्रॅम वजनाचे सोने लुटून आरोपी फरार झाले.

यानंतर संतोष गुप्ता यांनी तात्काळ बांगूर नगर पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. बांगूर नगर पोलिसांनी तात्काळ तपासाची सूत्रे हलवली. इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले.

48 तासांच्या आत आरोपी जेरबंद

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी कसून शोध घेत 48 तासाच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. सर्वेश नावाचा आरोपी यापूर्वी संतोष गुप्ता यांच्या घरी फर्निचरचे काम करण्यासाठी आला होता. त्याने घराची सर्व माहिती दोन्ही दरोडेखोरांना दिली होती. त्यानंतर त्यांनी दरोडा टाकला.