AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्नीची हत्या करण्यापासून अंत्यसंस्कार करेपर्यंत! डॉक्टर दाम्पत्यामधील थरारक मॅर्डर मिस्ट्री

दोघेही बीएमएस डॉक्टर, एकत्र हॉस्पिटल सुरु केलं, तिथेच प्रॅक्टीसही करायचे, पण बायकोला त्याने का संपवलं?

पत्नीची हत्या करण्यापासून अंत्यसंस्कार करेपर्यंत! डॉक्टर दाम्पत्यामधील थरारक मॅर्डर मिस्ट्री
डॉक्टर पत्नीच्या हत्येचं गूढ उकललंImage Credit source: TV9 Marathi
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Dec 15, 2022 | 12:34 PM
Share

उत्तर प्रदेश : चक्क डॉक्टर पतीने आपल्या डॉक्टर पत्नीची हत्या केली. या हत्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टर पतीने आपल्या पत्नीचा मृतदेह नंतर तब्बल 250 किलोमीटर पेक्षा जास्त दूर घेऊन जात तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. ही खळबळजनक घटना लखीमपूर खेरी इथं घडली. सध्या पोलिसांकडून आरोपी डॉक्टर पतीची कसून चौकशी केली जाते आहे. हत्येची ही घटना 26 नोव्हेंबर 2022 रोजी घडली होती. आरोपी पतीच्या चौकशीतून त्याने गुन्हा कबूल केला असल्याचंही समोर आलंय. पोलिसांनी या हत्याकांडाचा खुलासा करताना महत्त्वपूर्ण माहिती समोर आणली आहे.

वंदना आणि आशुतोष यांचं 2014 साली लग्न झालं. दोघंही पेशाने बीएमएस डॉक्टर. दोघांनी मिळून एक रुग्णालय सुरु केलं होतं. रुग्णालयाचं नाव होतं गौरी. याच रुग्णालयात दोघं मिळून प्रॅक्टिस करत होते.

2018 साली वंदना आणि आशुतोष यांच्या सुखी संसारात एक विचित्र घटना घडली. आशुतोष छतावरुन पडले आणि त्याच्या पाठीची नस दबली गेली. त्यानंतर त्यांना प्रकृतीच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या. प्रकृती अस्वस्थ्यतून पती-पतीमध्ये चिडचिड, वाद, भांडण वाढू लागली.

2020 साली डॉक्टर वंदना यांनी जुळ्या मुलांना जन्म दिला. टेस्ट ट्यूब बेबी द्वारे वंदना आणि आशुतोष यांना संतानप्राप्ती झाली होती. पण त्यानंतही त्यांच्या संसारात धुसफूस सुरुच होती. भांडणं वाढतच गेली. पुढे डॉक्टर आशुतोष पत्नी डॉक्टर वंदना यांना मारहाणही करु लागला होता.

तारीख होती 26 नोव्हेंबर 2022. वेळ संध्याकाळी 5 वाजताची. आशुतोष आणि वंदना यांच्यातील हे भांडण शेवटचं ठरलं. संतापाच्या भरात वंदनाला मारहाण करताना आशुतोषने तिच्या डोक्यावर वार केला. गंभीर जखम झाल्यामुळे डॉक्टर वंदना यांचा मारहाणीत मृत्यू झाला. यानंतर घाबरलेल्या डॉक्टर आशुतोष यांनी आपल्या वडिलांना फोन केला आणि घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर आशुतोष यांने वडिलांसोबत मिळून वंदनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कट रचला. वंदनाचा मृतदेह एका बॉक्समधून भरुन शहराच्या बाहेर घेऊन जाण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिकेत हा मृतदेह ठेवून आशुतोष 284 किलोमीटर लांब गढमुक्तेश्वर या ठिकाणी आला. तिथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर त्याने पत्नीचे अंत्यसंस्कार केले. त्यासाठी त्याला 1300 रुपयांची पावती फाडावी लागली होती.

पत्नीवर अंत्यसंस्कार करुन आल्यानंतर आशुतोष आणि त्याच्या वडिलांनी स्वतःच पोलिसांत जावून डॉक्टर वंदना बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरु केला. काहीच शोध लागत नसल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी उलट तपास सुरु केला. तेव्हा बापलेकाचा कट उघड झाला.

पोलिसी खाक्या दिसताच बापलेकानं आपणच वंदनाची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी डॉक्टर आशुतोष आणि त्याच्या वडिलांना अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हाही नोंदवला आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपासही केला जातोय.

26 नोव्हेंबर रोजी हत्या केल्यानंतर 27 नोव्हेंबर रोजी गौरी रुग्णालयात एक संशयास्पद रुग्णवाहिका आली असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या रुग्णवाहिकेमुळे पोलिसांना डॉक्टर आशुतोषनेच हत्या केलेली असू शकते, अशी शंका आली. त्यानंतर केलेल्या उलट तपासणीतून डॉक्टर दाम्पत्याची ही मर्डर मिस्ट्री उलगडली गेलीय.

Follow Us
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन