AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातून दुर्गंधी का येतेय? शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले; दरवाजा तोडताच समोर अनेक… मीरारोडमध्ये असे काय घडले?

मीरा रोडमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने महिलेची हत्या केली आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

घरातून दुर्गंधी का येतेय? शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले; दरवाजा तोडताच समोर अनेक... मीरारोडमध्ये असे काय घडले?
मीरारोडमध्ये असे काय घडले?Image Credit source: socialmedia
| Updated on: Jun 08, 2023 | 8:12 AM
Share

मीरा रोड : चर्चगेट येथील वसतिगृहातील एका विद्यार्थीनीच्या हत्येने मुंबई हादरलेली असतानाच आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मीरा रोडमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या पुरुषाने 32 वर्षीय तरुणीची हत्या करून तिच्या धडाचे तुकडे केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून याबाबत नया नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सरस्वती वैद्य (32) असे मृत महिलेचे नाव आहे. ही महिला मागील काही काळापासून मनोज सहानी (55) या व्यक्तीसोबत मीरा रोड येथील गीता नगरच्या आकाशदीप सोसायटीतील सातव्या मजल्यावर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. बुधवारी सरस्वतीच्या घरातून दुर्गंध येत असल्यामुळे शेजाऱ्यांना प्रचंड त्रास झाला. घराला कुलूप लावलेली असताना घरातून कशाची दुर्गंधी येतेय? असा प्रश्न शेजाऱ्यांना पडला. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्यांना घरात महिलेचा मृतदेह आढळून आला. मृतदेहच्या धडाचे तुकडे करून त्यातील काही अवशेष गायब करण्यात असल्याचे दिसून आले. या क्रूर आणि विकृतपद्धतीने करण्यात आलेल्या खुनामुळे पोलीसही चक्रावून गेले.

आरोपीकडून गुन्ह्याची कबुली

हा मृतदेह सरस्वती यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी मनोज सहानी याला माहिती घेण्यासाठी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांचा खाक्या बसताच सरस्वतीची आपणच हत्या केली असल्याची कबुली मनोजने दिली आहे. त्यामुळे आरोपीला ताब्यात घेऊन नया नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

केवळ पायच आढळले

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांना या घरातून केवळ महिलेचे पाय सापडले आहेत. महिलाच्या शरीराचे इतर अवयव गायब आहेत. आरोपीनी या महिलेचे अवयव इतर ठिकाणी डिस्पोज केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. या महिलेच्या शरीराचे किती अवयव गायब करण्यात आले आहे हे पोलिसांनाही माहीत नसल्याचं समोर आलं आहे.

तीन वर्षापासून एकत्र

आरोपी मनोज आणि सरस्वती या फ्लॅटमध्ये गेल्या तीन वर्षापासून एकत्र राहत होते. त्यांनी या सोसायटीत भाड्याने रुम घेतला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. या दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या मनोजने तिची हत्या केली. त्यानंतर झाड कापणारी मशीन आणली आणि या महिलेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?