मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

| Updated on: Jul 12, 2021 | 10:51 AM

गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये धाड टाकली. हे हॉटेल मुंबईच्या पश्चिमी उपनगरातील जुहू बीचजवळ आहे.

मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका
Follow us on

मुंबई : मुंबईत एका हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे (Mumbai High Profile Sex Racket Busted). या सेक्स रॅकेटवर धाड टाकत पोलिसांनी देहव्‍यापारात अडकलेल्या 8 मॉडल्सला मुक्त केलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे (Mumbai High Profile Sex Racket Busted).

गुप्त माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये धाड टाकली. हे हॉटेल मुंबईच्या पश्चिमी उपनगरातील जुहू बीचजवळ आहे.

हे सेक्स रॅकेट बॉलिवूडचा एक कास्टिंग डायरेक्टर आणि सिनेमा निर्माता चालवत होता. सिनेमात काम मिळवण्याचं आमिष देऊन तो मॉडेल आणि अभिनेत्रींना सेक्स रॅकेटच्या दलदलीत ढकलायचा.

पोलिसांची हॉटेलवर धाड

मुंबई गुन्हे शाखेच्या क्रिमिनल इंटेलिजेंस यूनिट (CIU) चे एपीआई सचिन कदम यांनी सांगितलं की, प्रेम नावाचा एक व्यक्ती जो कास्टिंग दिग्दर्शक आणि सिनेमा निर्माता आहे, तो मॉडेलिंग आणि स्ट्रगल करत असलेल्या अभिनेत्रींना पहिले आपल्या जाळ्यात अडकवायचा आणि मग त्यांना ब्लॅकमेल करुन वेश्याव्यवसायात जाण्यास भाग पाडायचा, अशी गुप्त माहिती मिळाली होती. त्यामाहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकून या महिलांना सोडवलं.

खात्यात दोन लाख जमा करुन आरोपीपर्यंत पोहोचले

पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, वेश्याव्यवसाय रॅकेटसाठी ग्राहकांना अनेक वेबसाईटच्या माध्यमातून बोलावलं जात होतं. माहितीच्या आधारे पोलिसांनी सापला रचला आणि बनावट ग्राहक बनून प्रेमच्या खात्यात दोन लाख रुपये जमा केले. त्यानंतर 19 जानेवारीला जुहूच्या रमाडा प्लाझा हॉटेलमध्ये सामाजित सेवा शाखेच्या CIU ने सापळा रचला आणि प्रेमला दोन महिलांसह पकडलं.

मॉडलिंग, वेब सिरीज आणि सीरिअलचे काही असायन्मेंट मिळवून दिले

तपासात पुढे आले की, अटक केलेली एक महिला ही कोलकात्याची आहे. तिलाही अभिनेत्री बनवण्याच्या नावावर या सेक्स रॅकेटमध्ये ओढण्यात आलं होतं. या तिघांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणावरुन 8 तरुणींना वाचवलं. यापैकी काही तरुणींनी मॉडलिंग, वेब सिरीज आणि सीरिअलचे काही असायन्मेंट केले होते. आरोपी त्यांना काम देण्याचं आमिष देऊन आधी कॉम्प्रमाईज करण्यास सांगायचा (Mumbai High Profile Sex Racket Busted).

5.5 लाख रोकड आणि 15 स्मार्टफोन जप्त

प्रेम आणि इतर दोन महिलांविरोधात मुंबईच्या जुहू पोलीस ठाण्यात कलम 120बी, 370, 34 सह अवैध तस्करी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींजवळून 5,59,000 रुपयांची रोकड आणि 15 स्मार्टफोन आणि एक डस्टर कार जप्त करण्यात आली आहे.

त्याशिवाय, तीन अशा लोकांना अटक करण्यात आली आहे, जे तरुणींना भुरळ पाडून वेश्याव्यवसायात ढकलायचे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये आणखी काही जण सहभागी असल्याची शक्यता आहे. सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सोबतच मुक्त करण्यात आलेल्या तरुणींचीही चौकशी केली जात आहे.

या तरुणींपैकी सर्वाधिक मॉडेल या त्यांचं भविष्य बनवण्यासाठी मुंबईत आल्या होत्या. पण, काम न मिळाल्याने त्या निराश झाल्या होत्या. वेश्याव्यवसायातील दलाल अशाच मजबूर तरुणींचा फायदा उचलतात आमि त्यांना आपल्या जाळ्यात अडकवतात.

Mumbai High Profile Sex Racket Busted

संबंधित बातम्या :

नागपुरात पाच जणांकडून गळा चिरुन तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण

मैत्रीच्या नात्याला काळिमा! मैत्रिणीच्या पतीनंच तरुणीवर अत्याचार केल्यानं खळबळ

अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार, 33 नराधमांना अटक, केरळमधील धक्कादायक प्रकार