नागपुरात पाच जणांकडून गळा चिरुन तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

नागपुरात पाच जणांकडून गळा चिरुन तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

एका 30 वर्षीय तरुणाची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

Nupur Chilkulwar

|

Jan 21, 2021 | 9:28 AM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना घडली (Nagpur Youth Murder By Five). गळा चिरुन एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. बाजार परिसरातील राजबाबा बिअर बारसमोर ही हत्येची घटना घडली. प्रशांत घोडेस्वर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. रात्री उशिरा ही हत्या झाल्याची माहिती आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत (Nagpur Youth Murder By Five).

नेमकं काय घडलं?

बुधवारी रात्री उशिरा खापरखेडा येथे बाजार परिसरातील राजबाबा बिअर बारसमोर 30 वर्षीय तरुणाची गळा चिरुन हत्या करण्यात आली. प्रशांत घोडोस्वार असं या तरुणाचं नाव असल्याची माहिती आहे.

रात्री उशिरा प्रशांत घरी जात असताना पाच आरोपींनी त्याला राजबाबा बिअर बारसमोर अडवून धरले. त्यावेळी आरोपींनी जुना वाद उकरुन काढत आधीच सोबत आणलेल्या धारधार शस्त्राने प्रशांत घोडेस्वार याच्या गळ्यावर वार केले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. मात्र, तोपर्यंत प्रशांतचा मृत्यू झालेला होता. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवून हत्येचा तपास सुरु केला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हत्येची घटना जागेच्या वादातून घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशांत घोडेस्वार यांच्या खुनाचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असल्याने पोलिसांनी रेकॉर्डिंग ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Nagpur Youth Murder By Five

संबंधित बातम्या :

पिंपरी-चिंचवडमध्ये भरदिवसा पिस्तुलाचा धाक दाखवून ऑफिसमधून तरुणीचे अपहरण

मैत्रीच्या नात्याला काळिमा! मैत्रिणीच्या पतीनंच तरुणीवर अत्याचार केल्यानं खळबळ

मोबाईल न दिल्याचा राग, मुलाकडून बापाच्या डोक्यात चोपणीने वार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें