मोबाईल न दिल्याचा राग, मुलाकडून बापाच्या डोक्यात चोपणीने वार

मोबाईल न दिल्याचा राग, मुलाकडून बापाच्या डोक्यात चोपणीने वार

रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात ही घटना घडली. (Son Murder Father in Raigad district)

Namrata Patil

|

Jan 19, 2021 | 9:00 PM

रायगड : मोबाईल देत नसल्याच्या रागात मुलाने बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंगण चोपायच्या चोपणी डोक्यात वार केल्याने बापाचा जागीच मृत्यू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यात ही घटना घडली. (Son Murder Father in Raigad district)

मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मुंबईतील काम सुटल्याने आरोपी मुलगा भावेश हा आपल्या वडिलांसोबत राहत होता. वडील भागुराम माझा मोबाईल देत नाहीत, या एका क्षुल्लक कारणामुळे त्यांच्या वाद व्हायचे. काल रात्री 8 च्या सुमारास भावेश आणि वडिलांचा वाद झाला.

त्यावेळी भावेशला राग अनावर झाला. त्याने दारूच्या नशेत जन्मदात्या बापाला अंगण चोपण्यासाठी वापरात येणाऱ्या चोपणीने वार केले. यात भागूराम यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने हा प्रकार कोणालाही समजला नाही.

मात्र दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी शेजारीच राहणारे भागूराम यांचे मित्र चौकशी करायला गेले. त्यावेळी भावेशने स्वतः ही सर्व घटना त्यांना दाखवली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांशी संपर्क साधला.

तळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी भावेशला ताब्यात घेतले. पण जन्मदात्या बापालाच त्याच्या मुलाने मारल्याने संपूर्ण तळा तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे. दरम्यान एका महिन्यापूर्वी तळा तालुक्यातील बोरघार येथे एकाने दोन खून केल्याची घटना समोर आली होती. (Son Murder Father in Raigad district)

संबंधित बातम्या : 

संतापजनक! गुगलचा एचआर असल्याची बतावणी करून 50 तरुणींचं लैंगिक शोषण; पोलिसांकडून जेरबंद

धक्कादायक! भोंदूबाबाकडून एका कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें