संतापजनक! गुगलचा एचआर असल्याची बतावणी करून 50 तरुणींचं लैंगिक शोषण; पोलिसांकडून जेरबंद

या आरोपीने आतापर्यंत अहमदाबाद, उज्जैन, ग्वालियर, गोवा, छत्तीसगडसह अनेक राज्यातील मुलींची फसवणूक केली आहे. (Ahmedabad Cyber Cell Arrest Fraud fake Hr Manager Matrimonial Site) 

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 19:45 PM, 19 Jan 2021
संतापजनक! गुगलचा एचआर असल्याची बतावणी करून 50 तरुणींचं लैंगिक शोषण; पोलिसांकडून जेरबंद
अटक

अहमदाबाद : अहमदाबादच्या सायबर क्राईम ब्रँचने नुकतंच एका आरोपीला अटक केली आहे. या आरोपीने आतापर्यंत 50 हून अधिक मुलींची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केले. संदीप शंभूनाथ मिश्रा असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीकडून 30 हून अधिक सिम कार्ड, 4 फोन, फेक आयडी जप्त केले आहेत. या आरोपीने आतापर्यंत अहमदाबाद, उज्जैन, ग्वालियर, गोवा, छत्तीसगडसह अनेक राज्यातील मुलींची फसवणूक केली आहे. (Ahmedabad Cyber Cell Arrest Fraud fake Hr Manager Matrimonial Site)

गेल्यावर्षी संदीपने अहमदाबादमधील एका 28 वर्षीय मुलीची फसवणूक करत तिचे शारिरिक शोषण केले होते. यानंतर त्या मुलीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. अखेर अहमदाबादच्या सायबर क्राईम ब्रँचला या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप शंभूनाथ मिश्राने मेट्रिमोनियल साईटवर वेगवेगळ्या नावे रजिस्ट्रेशन केले होते. तसेच त्याने या साईटवर गुगलचा एचआर म्हणून सांगितले होते. मला 40 लाख रुपये पगार मिळतो, असे त्याने प्रोफाईलमध्ये नमूद केले होते. त्याशिवाय त्याने आयआयएम अहमदाबादमधून एमबीएची पदवी घेतल्याचेही यात लिहिले होते.

संदीप हा गुगलचा एचआर असल्याचे सांगत मोठ्या मुलींना फसवायचा. मला लाखभर रुपये पगार आहे, अशा अनेक गोष्टी सांगत तो मुलींचा विश्वास संपादन करायचा. त्याने विहान शर्मा, प्रतिक शर्मा, आकाश शर्मा यासारख्या विविध नावे खोटे प्रोफाईल तयार केले होते. या प्रोफाईलद्वारे तो हायप्रोफाईल मुलींच्या संपर्कात यायचा.

त्यानंतर आपले कुटुंब, आई, वडील, बहिण यांचे खोटे फोटो दाखवत त्यांचा विश्वास संपादन करायचा. या आरोपीने आतापर्यंत 50 हून अधिक मुलींना फसवलं आहे. त्याच्याकडून 30 हून अधिक सिम कार्ड, 4 फोन, फेक आयडी जप्त केले आहेत. या आरोपीने अहमदाबाद, उज्जैन, ग्वालियर, गोवा, छत्तीसगडसह अनेक राज्यातील मुलींची फसवणूक केली होती.  (Ahmedabad Cyber Cell Arrest Fraud fake Hr Manager Matrimonial Site)

संबंधित बातम्या : 

अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार, 33 नराधमांना अटक, केरळमधील धक्कादायक प्रकार

धक्कादायक! भोंदूबाबाकडून एका कुटुंबातील 4 महिलांवर अत्याचार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या