AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार, 33 नराधमांना अटक, केरळमधील धक्कादायक प्रकार

निर्भया केंद्रात जेव्हा या मुलीचं काऊंसलिंग सेशन सुरु होतं, त्यादरम्यान तिने 38 जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली, असं पोलिसांनी सांगितलं.

अल्पवयीन मुलीवर 38 जणांचा लैंगिक अत्याचार, 33 नराधमांना अटक, केरळमधील धक्कादायक प्रकार
हा धर्मगुरू मूळचा गुजरातमधील आहे.
| Updated on: Jan 19, 2021 | 11:45 AM
Share

तिरुवनंतपुरम : केरळमध्ये (Kerala) एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 38 जणांनी लैंगिक अत्याचार (Sexual Harassment Of Minor Girl) केल्याचं धक्कादायक प्रकरण पुढे आलं आहे. येथील 17 वर्षीय अल्पवयीन (17 Years Minor Girl) मुलीवर एक दोन नव्हे तर तब्बल 38 जणांनी ( 38 Men) लैंगिक अत्याचार केला. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात तिच्यासोबत हे घडलं (Sexual Harassment Of Minor Girl).

निर्भया केंद्रात (Nirbhaya Centre) जेव्हा या मुलीचं काऊंसलिंग सेशन (Counselling Session) सुरु होतं, त्यादरम्यान तिने 38 जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती दिली, असं पोलिसांनी सांगितलं.

2016 पहिल्यांदा लैंगिक अत्याचार झाला

मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेसोबत लैंगिक अत्याचाराची पहिली घटना ही 2016 मध्ये झाली होती. तेव्हा ती फक्त 13 वर्षांची होती. त्यानंतर एका वर्षानंतर पुन्हा तिच्यासोबत हे राक्षसी कृत्य घडलं. दुसऱ्या घटनेनंतर तिला बाल गृहात पाठवण्यात आलं. त्यामनंतर जवळपास वर्षभरानंतर तिला तिच्या आई आणि भावासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली.

काऊंसलिंग सेशनदरम्यान हकीगत पुढे आली

सर्किल पोलीस निरिक्षक मोहम्मद हनिफा यांनी सांगितलं, “बाल गृहातून निघाल्यानंतर पीडिता काही काळापर्यंत बेपत्ता होती. गेल्या डिसेंबरमध्ये ती पलक्कडमध्ये असल्याची माहिती मिळाली. तेथून तिला निर्भया केंद्रात आणण्यात आलं”. काऊंसलिंग सेशन दरम्यान पीडितेने निर्भया सेंटरमध्ये तिच्यासोबत झालेल्या लैंगिक अत्याचार आणि छेडछाडीच्या घटनेची माहिती दिली, असंही पोलीस निरिक्षकांनी सांगितलं.

33 जणांना अटक

38 नराधमांविरोधात लैंगिक शोषणासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर यापैकी 33 आरोपींना अटकही करण्यात आली आहे. सध्या अटकेत असलेले सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. ‘समितीने वर्षभरापूर्वी अल्पवयीन मुलीला बाहेर पाठवण्यापूर्वी सर्व कायदे आणि सुरक्षा नियमांचं पालन करत निर्णय घेतला होता’, अशी माहिती मलाप्पुरम बाल कल्याण समितीचे अध्यक्ष शाजेश भास्कर यांनी दिली.

Sexual Harassment Of Minor Girl

संबंधित बातम्या :

बाप, लखनौमधून लेकी पाठोपाठ नागपुरात आला, सासरच्यांनी काटा काढला!

पत्नी सासरी परतली नाही म्हणून पतीचं टोकाचं पाऊल, संपूर्ण कुटुंबाला जिवंत पेटवलं

प्रेमविवाहासाठी घरातून पोबारा, पालघरमध्ये प्रियकराने प्रेयसीला भिंतीत गाडलं

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क मोबाईलची चोरी, पिंपरीतील धक्कादायक प्रकार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.