बांग्लादेशी मुस्लिम महिला हिंदू पुरुषांना कसं टार्गेट करतात? मुंबईत इंटरनॅशनल रॅकेटचा पदार्फाश
मुंबई क्राइम ब्रांचने एका मोठ्या इंटरनॅशनल रॅकेटचा पदार्फाश केलाय. बांग्लादेशी मुस्लिम महिला हिंदू पुरुषांना कसं टार्गेट करतात? त्यांच्या टॅक्टिक्स काय असतात? याचा खुलासा मंजू शर्मा या महिलेच्या चौकशीतून झालाय.

मुंबई क्राइम ब्रांचने अलीकडेच एक महिलेला अटक केली. मंजू शर्मा ऊर्फ अल्ताफ शेख असं या महिलेच नाव आहे. ही महिला बेकायदरित्या बांग्लादेशातून भारतात दाखल झालेली. तिच्या चौकशीतून एका मोठ्या नेटवर्कचा खुलासा झाला आहे. बऱ्याच वर्षांपासून बनावट भारतीय ओळखपत्र तयार करुन परदेशी नागरिकांना भारतात वसवण्याच काम हे नेटवर्क करत होतं. सूत्रांच्या माहितीनुसार, अल्ताफने सांगितलं की, बांग्लादेशी नागरिक सर्वप्रथम एजंट्सच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये जन्माचा बनावट दाखल बनवतात. त्या आधारावर आधार कार्ड बनवलं जातं. कागदपत्र हाती आल्यानंतर या घुसखोरांना भारताच्या वेगवेगळ्या शहरात पाठवलं जातं. इथे ते आपली ओळख लपवून सर्वसामान्यांमध्ये मिसळून जातात.
प्रेम जाळ्यात फसवून विवाह करणं हा सुद्धा या टोळीच्या रणनितीचा भाग आहे असं सूत्रांनी सांगितलं. अल्ताफ शेखने मान्य केलं की, महिला घुसखोर खासकरुन हिंदू पुरुषांना टार्गेट करतात. पुरुष घुसखोर कायमस्वरुपी देशात राहण्यासाठी हिंदू मुलींशी लग्न करण्याचा प्रयत्न करतात.
दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर त्यांनी…
अल्ताफ शेखने स्वत: सुद्धा असं करण्याचा प्रयत्न केला. आधी ती पश्चिम बंगालमार्गे भारतात घुसली. खोटी कागदपत्र तयार केली आणि मग मुंबईत येऊन पुरुषोत्तम प्रसाद शर्मा यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळीक वाढल्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यानंतर ती मंजू शर्मा नावाने अनेक वर्षांपासून भारतात राहत होती.
मुंबई पोलिसांनी किती हजार बांग्लादेशी नागरिकांना परत पाठवून दिलय?
पुरुषोत्तमने बनावट कागदपत्रांच्या आधारे तिचं आधार कार्ड बनवलं. मुंबईत क्राइम ब्रांचने 3 ऑगस्ट 2025 रोजी अल्ताफ आणि तिच्या पतीला अटक केली. हे रॅकेट देशातील अन्य भागातही पसरलं असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. मागच्या तीन महिन्यात मुंबई पोलिसांनी जवळपास 1000 बांग्लादेशी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवलं आहे. ही संख्या सतत वाढत आहे. प्रकरणाचा तपास वेगाने सुरु आहे. या टोळीशी संबंधित अजूनही अन्य नावं पुढे येण्याचा पोलिसांना संशय आहे.
