AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : खासदार पप्पू यादव यांच्यावर नवी दिल्लीत चाकू हल्ल्याचा प्रयत्न

| Edited By: | Updated on: Aug 02, 2026 | 6:50 PM
Share

Maharashtra News LIVE : संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या मुखपत्रातून त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. मोदींना पक्षातील लोकांकडून घेरल्याचा संशय राऊतांनी व्यक्त केला आहे. . यासह महाराष्ट्र, देश-विदेश, क्रीडा, मनोरंजन, राजकारणातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra News LIVE : खासदार पप्पू यादव यांच्यावर नवी दिल्लीत चाकू हल्ल्याचा प्रयत्न

LIVE NEWS & UPDATES

  • 02 Aug 2026 06:50 PM (IST)

    माळशेज घाटात मद्यधुंद तरुणांची हाणामारी

    माळशेज घाटातील करंजाळ परिसरात काही स्थानिक तरुणांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली.  या घटनेत मद्यधुंद अवस्थेतील एका तरुणाला मारहाण करण्यात आली. गोंधळाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, काही तरुणांनी पोलिसांनाही अरेरावी करत हुज्जत घातली.  त्यानंतर पोलीस कोणतीही कारवाई न करता तेथून निघून गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

  • 02 Aug 2026 06:33 PM (IST)

    खासदार पप्पू यादव यांच्यावर नवी दिल्लीत चाकू हल्ल्याचा प्रयत्न

    संसदेत राममंदिर दान चोरी प्रकरणात आंदोलन करुन चर्चेत आलेले खासदार पप्पू यादव यांच्यावर नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत एका अज्ञाताने चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

  • 02 Aug 2026 06:17 PM (IST)

    पुन्हा संधी दिली तरी विद्यार्थी उखडून टाकतील – प्रकाश आंबेडकर

    केंद्र सरकारला आव्हान आहे की तुम्ही नेमके वाचला आहात. विद्यार्थ्यांचा हा राग काय थांबणारा नाही. पुन्हा संधी दिली तरी विद्यार्थी उखडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबडेकर यांनी दिला आहे.

  • 02 Aug 2026 06:00 PM (IST)

    अजिंठा डोंगराच्या कुशीतील डालकीची धार धबधबा प्रवाहित

    जळगावच्या जामनेर तालुक्यातील अजिंठा डोंगराच्या कुशीतील डालकीची धार धबधबा प्रवाहित

    दोन-तीन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने धबधबा झाला प्रवाहित

    धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी

    नागरिकांच्या गर्दीमुळे या परिसरामध्ये वाहतुकीची मोठी कोंडी

  • 02 Aug 2026 05:50 PM (IST)

    अहिल्यानगरमध्ये मुख्य जलवाहिनी फुटली, पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

    नगर-मनमाड रोडवरील विळद पाण्याच्या टाकीजवळ मुख्य जलवाहिनी फुटली

    पाईपलाईन फुटताच उडाले अनेक फूट उंच पाण्याचे फवारे

    सुरक्षिततेच्या कारणास्तव काही काळासाठी रस्ता वाहतुकीसाठी बंद

    या घटनेचा अहिल्यानगर शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता

    संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल

    जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू

  • 02 Aug 2026 05:34 PM (IST)

    इगतपुरीमध्ये मैत्री दिनानिमित्त वृक्षारोपण

    इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक गोदावरीचा यांच्या वतीने जागतिक मैत्री दिनानिमित्त तरुणाईसाठी निसर्गाशी जुळविली नाळ हा अनोखा उपक्रम साजरा करत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

  • 02 Aug 2026 05:15 PM (IST)

    पीयूष गोयल यांच्याकडून चारकोप कोस्टल रोडच्या कामाची पाहणी

    केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज चारकोप येथे सुरू असलेल्या कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत कामाचा आढावा घेतला. यावेळी प्रकल्पाशी संबंधित वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते त्यांच्यासोबत उपस्थित होते. कामाची सद्यस्थिती, वेळापत्रक आणि येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली.

  • 02 Aug 2026 04:50 PM (IST)

    विरारमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात

    विरारमध्ये दुपार नंतर जोरदार पाऊस पडायला सुरवात झाली आहे. अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्याने नागरिक आणि रहिवाशांची तारांबळ उडत आहे. पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील शेतकरी समाधानी झाला आहे

  • 02 Aug 2026 04:40 PM (IST)

    एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा देशाच्या विकासासाठी एकत्र या- प्रफुल पटेल

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनात जे काही घडले, त्याची वेदना आपल्या सर्वांनाच आहे, असे सांगत या विषयावर एकमेकांच्या अंगावर चिखल फेक न करता सर्वांनी देशाच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची गरज व्यक्त केली.

  • 02 Aug 2026 04:30 PM (IST)

    आंदोलनाकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही- प्रफुल पटेल

    अभिजीत दीपके हे आपल्या देशातील एक तरुण नागरिक आहेत. त्यांनी एखाद्या विषयाला धरून आंदोलन केले असेल, तर त्याकडे फार गांभीर्याने किंवा मनात धरून पाहण्याचे काहीच कारण नाही. दीपके यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आणि मागण्यांवर सरकारने योग्य तो निर्णय घेऊन विचार केला असे प्रफुल पटेल यांनी म्हटले आहे.

  • 02 Aug 2026 04:20 PM (IST)

    केजरीवालांकडे दुसरा कोणताही मुद्दा नाही- प्रफुल पटेल

    20 % एथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी 4 ऑगस्ट रोजी पंतप्रधानांच्या निवासाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. केजरीवाल यांच्या या इशाऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी जोरदार पलटवार केला आहे. अरविंद केजरीवाल यांना आता दुसरं काही काम उरलेलं नाही, असा टोला त्यांनी लगावला.

  • 02 Aug 2026 04:10 PM (IST)

    जळगावच्या चोपडा शहरात रस्त्यावरती खड्ड्यांचे साम्राज्य

    जळगावच्या चोपडा शहरात रस्त्यावरती खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना मोटरसायकल व पायी चालताना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मच्छी मार्केटकडे जाणाऱ्या पुलावर तसेच बस स्थानकासमोरील पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचले आहे.

  • 02 Aug 2026 03:55 PM (IST)

    बीड नगरपरिषदेत राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह

    बीड नगरपरिषदेत राजकीय समीकरण बदलण्याची चिन्ह. नगरपरिषदेमधील सत्ताधारी नगरसेवकांच्या एका गटाने नाराजीचा सूर. बीड नगरपरिषदेत क्षीरसागर बंधू एकत्र येण्याचे संकेत. 6 महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या विजयसिंह पंडितांच्या सत्तेसमोर राजकीय आव्हान

  • 02 Aug 2026 03:45 PM (IST)

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेत नवीन तरुणांना संधी

    शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्ष संघटनेत नवीन तरुणांना संधी. पक्षाच्या युवक अध्यक्षपदात विभागणी. शहरांसाठीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी विशाल वाकडकर यांची नियुक्ती. सुशील बोर्डेंची विद्यार्थी सेलच्या अध्यक्षपदी निवड

  • 02 Aug 2026 03:30 PM (IST)

    साताऱ्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली

    साताऱ्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी वाढली… लिंब येथील ऐतिहासिक कोटेश्वर महादेव मंदिराला पुराचा वेढा… मंदिराकडे जाणारा मार्ग आणि परिसरातील पूल पाण्याखाली गेल्याने भाविकांची गैरसोय…

  • 02 Aug 2026 03:13 PM (IST)

    करमाळ्यात संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला भाजपचं जोडेमारो आंदोलन

    सोलापूरच्या करमाळ्यात संजय राऊतांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला भाजपचं जोडेमारो आंदोलन… जयकुमार गोरेंबद्दल राऊतांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध… संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी….

  • 02 Aug 2026 03:00 PM (IST)

    मैदानातील पार्किंगविरोधात नागरीक-खेळाडूंचा संताप

    मुंबईतील प्रभादेवी येथील राजे संभाजी पार्क मैदानात होणाऱ्या पार्किंगला स्थानिक नागरिक व खेळाडूंनी कडाडून विरोध केला आहे. पार्किंगचा प्रस्ताव रद्द करण्याच्या मागणीसाठी प्रभादेवी स्पोर्ट्स क्लबच्या नेतृत्वाखाली आज पालिका प्रशासनाचा जाहीर निषेध केला जात आहे. स्थानीक खेळाडू व स्थानिक नागरिकांनी मैदान वाचवण्याची मागणी करत सिद्धिविनायक परिसर येथे तीव्र आंदोलनाची हाक दिली आहे

  • 02 Aug 2026 02:50 PM (IST)

    फ्रेंडशिप डे निमित्त अभिजीत दिपके यांना चिमुकल्यांकडून शुभेच्छा

    छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी अभिजीत दिपके यांना भेटण्यासाठी नागरिकांसह जेनजी तरुणांची गर्दी होत आहे. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आज चिमुकल्यांनी अभिजीत दिपके यांची भेट घेत त्यांच्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधत शुभेच्छा दिल्या.

  • 02 Aug 2026 02:40 PM (IST)

    मुंबई–नाशिक–आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी

    मुंबई–नाशिक–आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. माणिकखांब ते गोंदे औद्योगिक वसाहतीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. गेल्या १ तासांपासून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पाऊस, रस्त्यांवरील खड्डे आणि संथ गतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रविवार व वीकेंडमुळे पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. पर्यटनासाठी आलेले अनेक प्रवासी वाहतूक कोंडीत अडकले. वाहनचालकांना मोठा मनस्ताप झाला. प्रवासाचा वेळ वाढला महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले.

  • 02 Aug 2026 02:30 PM (IST)

    नाणेघाटातील तरुणांचा व्हिडिओ व्हायरल

    पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ नाणेघाट येथील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पर्यटनासाठी आलेल्या एका मुस्लिम कुटुंबासमोर काही तरुण-तरुणींनी महाराणा प्रताप यांच्यावरील एक गाणे गात टाळ्या वाजवल्याचा दावा या व्हिडिओसोबत केला जात आहे. या घटनेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पोलिस तक्रार दाखल झाल्याची किंवा प्रशासनाकडून अधिकृत भूमिका जाहीर झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तसेच या व्हिडिओ मागील नेमका संदर्भ किंवा हेतू काय होता हे समोर आलेले नाही

  • 02 Aug 2026 02:20 PM (IST)

    खासदार स्मिता वाघ यांचा संताप

    जळगावातील तरसोद ते पाळधी या बायपास वरील तडे पडलेल्या रस्त्याची तसेच भराव कोसळलेल्या पुलाची खासदार स्मिता वाघ यांच्याकडून पाहणी केली. खासदार स्मिता वाघ यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींची चांगलीच खरडपट्टी केली. खूप चुकीचं काम केलं, पैसे कमवण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळण्याचा तुम्हाला काय अधिकार? मी कुणालाही सोडणार नाही यांना कोर्टामध्ये खेचा, या शब्दात तुम्ही देत खासदार स्मिता वाघ यांनी संताप व्यक्त केला

  • 02 Aug 2026 02:10 PM (IST)

    आम्ही गुरू पाद्यपूजा केली

    काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांचे गुरुपौर्णिमेनिमित्त दुधाने पाय धुतल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावरून नाना पटोले यांच्यावर विरोधाकडून कडून टीका केली जात आहे. पण भाजपने आम्हाला हिंदू धर्म किंवा गुरुपौर्णिमा कशी असते हे शिकवू नये, नाना पटोले यांनी पाय धुऊन घेतले नाही तर नांदेडवरून आम्ही रत्नागिरीला गेलो होतो आणि गुरुपाद्य पूजा केली असा खुलासा दुधाने पाय धुणारे अनिल पाटील चिमेगावकर आणि माधवराव पवळे यांनी केलाय

  • 02 Aug 2026 02:00 PM (IST)

    वेगाने खड्डे बुजवण्याचे कामे हाती घेण्यात आली आहेत-मंत्री गिरीश महाजन

    मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या रस्त्यांची पहाणी सुरू केली आहे. पाच जणांचा एकत्र मृत्यू झाला वेगवेगळ्या घटना मध्ये झाला. पावसामुळे कामे करता आली नाही. आम्ही वेगाने खड्डे बुजवण्याचे कामे हाती घेतली आहेत. डांबराच्या किमती देखील वाढ झाले आहे. कामे सुरू आहेत यावेळी आपण सर्व रस्ते करत आहेत. पुढेच 30 ते 40 वर्ष खड्डे होणार नाही. सुंदर शहर कार्याचे असेल तर थोडा त्रास होईल, असे गिरीश महाजन म्हणाले.

  • 02 Aug 2026 01:55 PM (IST)

    गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक शहरातील रस्त्यांची, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांची पाहणी

    नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक शहरातील रस्त्यांची आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांची पाहणी करण्यात आली. नाशिकच्या मखमलाबाद परिसरात मनपाच्या अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी पाहणी केली. शहरातील रस्त्यांच्या अवस्थेमुळे अनेक नागरिक जखमी झाले तर पाच जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गिरीश महाजन गेल्या तीन दिवसांपासून नाशिकमध्येच आहेत.

  • 02 Aug 2026 01:41 PM (IST)

    देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात राहणार आहेत- प्रवीण दरेकर

    “भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व कोण करणार, हे ठरवण्याचा कुठलाही अधिकार सामनाला नाही. हा पक्षांतर्गत विषय आहे. हे सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई आणि नितीन गडकरी ठरवत असतात. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात राहणार आहेत,” अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकर यांनी दिली.

  • 02 Aug 2026 01:28 PM (IST)

    संगमनेरमध्ये पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त

    पाकिस्तानात तयार होणारी ‘गोरी ब्युटी क्रीम’ आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ संगमनेरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संगमनेर शहर पोलिसांच्या मदतीने गोल्डन मार्केटमधील दुकानावर छापा टाकण्यात आला. ही कारवाई शनिवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी करण्यात आली. यावेळी १२ हजार ९०० रुपयांचा पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला.

  • 02 Aug 2026 01:16 PM (IST)

    नंदुरबारमधील नवापूर तालुक्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस

    नंदुरबारमधील नवापूर तालुक्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. रंगावली धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे रंगावली आणि रायगंण नदीला पूर आला आहे. धरणातून विसर्ग सुरू झाल्याने रंगावली आणि रायगंण नद्या दुथडी भरून वाहत आहेत. रंगावली नदीने रौद्ररूप धारण केल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून नवापूर तालुक्यासाठी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून पुढील काही तास महत्त्वाचे आहेत.

  • 02 Aug 2026 01:06 PM (IST)

    नाशिक- दिपाली बेळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन पोहोचले

    नाशिकमध्ये खड्ड्यामुळे अपघात होऊन मृत्यू झालेल्या दिपाली बेळे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेटीसाठी मंत्री गिरीश महाजन पोहोचले आहेत. नाशिकच्या पंचवटीतील दिपाली बेळे या 65 वर्षीय वृद्ध महिलेचा खड्ड्यांमुळे मृत्यू झाला होता. महाजन यांनी बेळे कुटुंबीयांची भेट घेत त्यांची विचारपूस केली आहे.

  • 02 Aug 2026 12:59 PM (IST)

    धनंजय मुंडे पत्रकारांशी असं का वागले, हे मला माहीत नाही हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा – आमदार प्रकाश सोळंके

    जिल्ह्यातील विविध प्रश्नावरती खासदार तथा आमदारांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांसमोर प्रश्न मांडले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात तब्बल चार तास ही बैठक पार पडली. या बैठकीत कसल्याही पद्धतीची खडाजंगी झाली नाही.  मात्र यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार धनंजय मुंडेंनी पत्रकारांना का रोखलं हे मला माहीत नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांनाच विचारा, पालकमंत्री सुनेत्रा पवारांनी पत्रकारांना बरा वेळ दिला होता. मात्र धनंजय मुंडे यांनी असं का केलं माहित नाही. इथून पुढच्या पत्रकार परिषदेत तरी धनंजय मुंडे यांनी असं वागू नये असा सल्ला देखील आमदार प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांना दिला.

  • 02 Aug 2026 12:40 PM (IST)

    बुधवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार बैठक

    बुधवारी कॉक्रोच जनता पार्टीच्या कोर कमिटीची छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक होणार आहे. CJP चे कोअर कमिटीचे देशातील 15 ते 20 प्रमुख सदस्यांसोबत अभिजित दिपके चर्चा करणार. छत्रपती संभाजीनगरातील दिपकेंच्या घरात बैठक होणार.

  • 02 Aug 2026 12:28 PM (IST)

    संजय राऊत यांच्या विरोधात भाजप व बहुजन समाजाचे आंदोलन

    संजय राऊत यांच्या विरोधात भाजप व बहुजन समाजाने आंदोलन पुकारलं आहे, जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.  पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील संजय राऊत यांच्या टीकेच्या निषेधार्थ आज पंढरपुरात भाजप आणि बहुजन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक छायाचित्राला जोडे मारत निषेध व्यक्त केला आणि जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर यांनी, “यापुढेही असे वक्तव्य केल्यास तोंड काळे करून जीभ छाटू,” असा इशारा दिला.

  • 02 Aug 2026 12:20 PM (IST)

    करमाळ्यात भाजपच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

    करमाळ्यात भाजपच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून करमाळ्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आक्रमक निदर्शने करण्यात आली. करमाळ्यातील सुभाष चौक येथे भाजपच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधातील वक्तव्याचा निषेध करत खासदार संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

  • 02 Aug 2026 12:07 PM (IST)

    मोरांगणा येथील एटीएम अज्ञातांनी फोडले, एटीएम मशीन जळलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ

    मोरांगणा (खरांगणा) येथील एटीएम अज्ञातांनी फोडले असून एटीएम मशीन जळलेल्या स्थितीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझविली आहे.  रात्रीच्या सुमारास घटना उघडकीस आली. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेले, खरांगणा पोलिस ठाण्याचे ठाणेदार यांची भेट घेतली. श्वानपथक, फॉरेन्सिक पथकाकडून घटनास्थळी भेट देत चौकशी केली.

  • 02 Aug 2026 11:50 AM (IST)

    महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी

    महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी देण्यात आली आहे. 30 जुलैपासून राज्यात धर्मस्वातंत्र्य कायदा अधिकृतपणे लागू करण्यात आला आहे. कायद्यामुळे बेकायदेशीरपणे धर्मांतरास प्रतिबंध येणार आहे.

  • 02 Aug 2026 11:45 AM (IST)

    दादर टीटी परिसरात मॅनहोलभोवती कोणतेही बॅरिकेडिंग नाही

    दादर टीटी परिसरात मॅनहोलभोवती कोणतेही बॅरिकेडिंग नाही. पालिका कर्मचारीने एका तासानंतर यावर जाळी बसवली. यामुळे आता पादचारी आणि वाहनचालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • 02 Aug 2026 11:40 AM (IST)

    भाजप आमदार देवेंद्र कोठेंची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर खोचक टीका

    भाजप आमदार देवेंद्र कोठेंची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर खोचक टीका. विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या बुद्धीची दिवाळखोरी दाखवली आहे. शोले चित्रपटातील आसराणी प्रमाणे राजकारणातील आसराणी म्हणजे संजय राऊत आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील आमदार, खासदार निघून जात आहेत. ग्रामविकास मंत्री म्हणून जयकुमार गोरे उत्तम काम करत आहेत. जयकुमार गोरे हे पक्ष वाढवण्यासोबत त्यांनी स्वतः 4 वेळा निवडून आलेत. मात्र संजय राऊत स्वतः नगरसेवक म्हणून निवडून येऊ शकत नाहीत. संजय राऊत यांच्या वार्डातील बूथवर त्यांच्या पक्षाला किती मतं मिळालीत ते पाहावे. उद्धव ठाकरेंना विनंती की या माणसाला बाजूला ठेवले पाहिजे.  संजय राऊतांनी पक्ष संपवला आहे संपादक म्हणून आता सामना पेपर देखील बंद पाडतील. शोले पिक्चर आसराणी जेलर प्रमाणे महाविकास आघाडीतील आसराणी म्हणजे संजय राऊत आहे. संजय राऊतांना ठाकरे नावापेक्षा दिपके मोठे वाटायला लागले आहेत. त्यामुळे आता त्यांचा पक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वात चालवावा असे वाटत असेल.

  • 02 Aug 2026 11:35 AM (IST)

    रासायनिक खतांचा तुटवडा आणि वाढते दर यामुळे शेतकऱ्याने शोधला नवीन पर्याय

    रासायनिक खतांचा तुटवडा आणि वाढते दर यामुळे शेतकरी पर्याय शोधत असताना सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील सुरेश पवार या शेतकऱ्याने गांडूळ खत निर्मितीचा यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. घरातील अवघ्या तीन सदस्यांच्या मदतीने दर महिन्याला सुमारे ४० टन गांडूळ खत उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, ४० किलोची एक पिशवी ४४० रुपयांना विकली जात आहे. सेंद्रिय शेतीला चालना देतानाच हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवे साधन ठरत आहे… सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील शेतकरीसुरेश पवार हे आपल्या शेतात गांडूळ खताची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करत आहेत. शेणखत आणि सेंद्रिय अवशेषांपासून तयार होणारे हे गांडूळ खत जमिनीची सुपीकता वाढविण्यास उपयुक्त मानले जाते. दर महिन्याला ४० टन उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवून घरातील तीन सदस्य हा व्यवसाय सांभाळत आहेत. ४० किलोची एक पिशवी ४४० रुपयांना विकली जात असून परिसरातील शेतकऱ्यांकडूनही या खताला चांगली मागणी आहे. सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि शेतीसोबतच पूरक व्यवसायाचे हे यशस्वी उदाहरण म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.

  • 02 Aug 2026 11:30 AM (IST)

    भंडारा शहराच्या समस्यांवर काँग्रेस जिल्हाध्यक्षांची अनोखी ‘डान्स’ डिजिटल मोहीम

    शहरातील खड्डेमय रस्ते, तुंबलेल्या नाल्या, अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि अस्वच्छता यांसारख्या नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे भंडारा जिल्हाध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी एक अनोखा मार्ग शोधला आहे. त्यांनी शहरातील तरुण-तरुणींना सोबत घेऊन थेट रस्त्यांवर, तुंबलेल्या नाल्यांच्या बाजूला आणि आरोग्य केंद्रांसमोर संगीताच्या तालावर थिरकत आंदोलन केले आहे.

  • 02 Aug 2026 11:25 AM (IST)

    गणेश नाईकांचा एकनाथ शिंदेना पुन्हा आव्हान

    उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या क्लस्टर योजनेला मंत्री गणेश नाईकांचा विरोध आहे, 30 वर्षनंतरही न झालेल्या इमारतींचा क्लस्टर योजनेत समावेश करण्याच्या प्रयत्न केला आहे. गणेश नाईक म्हणाले की, ” माझ्या नादाला लागला तर त्याला त्याची जागा दाखवणार” असा इशारा नाईकंनी दिला आहे.

  • 02 Aug 2026 11:20 AM (IST)

    लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळवणाऱ्या लुटेरी दुल्हनला आता अटक

    नागपूरातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळवणाऱ्या लुटेरी दुल्हनला आता अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या तरुणाकडून पैसे आणि दागिने उकळणाच्या प्रकार समोर आला आहे. मुख्य सुत्राधार कोमल पांडेला सिताबर्डी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

  • 02 Aug 2026 11:15 AM (IST)

    जळगावातून धक्कादायक बातमी समोर

    जळगावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. जळगावात वडती गावात जन्मदात्या बापाकडून 2 मुलांवर कुऱ्हाडीने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलं झोपेत असताना कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. हल्यात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू आणि 11 वर्षाचा मुलगा गंभीर असल्याचे समजत आहे.

  • 02 Aug 2026 11:10 AM (IST)

    नालासोपाऱ्यातील वाकणपाडा भागात रस्त्याची दुरावस्था

    नालासोपाऱ्यातील वाकणपाडा भागात रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळत असल्याने आता नागरिकांचा संताप होत आहे. नालासोपाऱ्यातील वाकणपाडा भागातील उघड्या गटरात एक पादचारी पडला.

  • 02 Aug 2026 11:02 AM (IST)

    नाशिक मनपाला अखेर जाग

    नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्यांमुळे पाच जणांनी आपला जीव गमावला आहे. आता या घटनेनंतर नाशिक मनपाला जाग आली आहे. आता मंत्री महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यामुळे नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला आता सुरुवात झाली आहे.

  • 02 Aug 2026 10:50 AM (IST)

    ईडीने भोंदू अशोक खरातच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवे पुरावे सादर

    ईडीच्या म्हणण्यानुसार, साधारण 1 हजार किंमतीच्या पुष्कराज व डायमंडसदृश अंगठ्यांची जोडी भक्तांना ₹2.62 लाखांना विकण्यात आली. या अंगठ्यांमुळे आर्थिक संकट दूर होईल, व्यवसायात भरभराट होईल आणि दैवी शक्ती लाभेल, असे दावे करण्यात आल्याचा आरोप आहे. तपासात चिंचेच्या बिया सुमारे 100 प्रति किलो दराने खरेदी करून त्या 10 हजार ते 1 लाखांपर्यंत विकल्याचे समोर आले आहे. तसेच 300 ते 500 प्रति लिटर किंमतीचा मध “दैवी मध” म्हणून तब्बल 7 लाख प्रति लिटर दराने विकल्याचा दावा ईडीने केला आहे.

  • 02 Aug 2026 10:45 AM (IST)

    धाराशिवमध्ये भाजपच्या अंतर्गत गटबाजीचे दर्शन

    सत्काराच्या कार्यक्रमातून आमदार राणा जगजीत सिंह पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याचे आयोजक व्यंकटराव गुंड यांची माहिती. विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांच्या सत्कार कार्यक्रमाच्या पत्रिकेत आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांचे नाव नसल्याने चर्चा. भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य व्यंकटराव गुंड यांच्या रूपामाता परिवाराच्या वतीने आमदार बसवराज पाटील यांच्या सत्काराचे आयोजन

  • 02 Aug 2026 10:40 AM (IST)

    रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांनी पाच नागरिकांचा बळी घेतल्यानंतर नाशिक महापालिकेला जाग

    नाशिक शहरातील खड्डे बुजवण्यास महापालिकेकडून सुरुवात. शहरातील खड्डे बुजवण्यासह रस्त्यांच्या कामांना देखील वेग. कुंभ मंत्री गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना रस्त्याची दुरावस्था आणि खड्ड्यांच्या मुद्द्यावरून धारेवर धरल्यानंतर मनपा प्रशासनाला जाग

  • 02 Aug 2026 10:30 AM (IST)

    पंतप्रधान मोदींना 12 वर्षांत एका मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला- संजय राऊत

    ‘देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. पंतप्रधान मोदींना १२ वर्षांत एका मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा लागला. विद्यार्थी शिक्षणखात्याच्या विरोधात आंदोलन करू लागला. शिक्षण खाते हे तरुणांची पिढी घडवणारं भक्कम खाते असते. कोट्यवधी तरुणांचं भविष्य त्या खात्याशी संबंधित असतं. त्याच खात्याला वाळवी लागली. मोदींना माघार घ्यावी लागली. तरुणांनी मोदींचा पराभव केला.

  • 02 Aug 2026 10:20 AM (IST)

    इगतपुरी नगर परिषद रोडवर जुन्या इमारतीची भिंत

    पहाटेच्या सुमारास भिंत कोसळली. पहाटे रहदारी नसल्याने व आज सुट्टीचा दिवस असल्याने रहदारी नव्हती. सुदैवाने मोठी हानी टळली. इमारतीत कोणी राहत नसल्याने जीवित व वित्त हानी झाली नाही

  • 02 Aug 2026 10:12 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यात पावसाची विश्रांती

    गडचिरोली जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली तरी जिल्ह्यातील सर्वात मोठा मेडिगट्टा धरणातून ९ लाख ७१ हजार ८८० क्युसेक पाण्याचा विसर्ग. प्राणहिता गोदावरी इंद्रावती नदीला पूर परिस्थिती कायम. तेलंगाना राज्यातील श्री पद्म यल्लमपल्ली धरणातून मोठ्या पाणी सोडण्यात आल्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. मेडिगट्टा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्ग खालच्या स्तरावर होत असल्यामुळे खालच्या स्तरावर असलेले गावे_ गुमलकोंडा मुतापूर, मुकिळीगुट्टा सोमनपल्ली. असरअली क्षेत्रातील छोटी गावे पुराच्या धोक्यात. गोदावरी नदीला पूर आल्यामुळे नदीची रुंदी तीन किलोमीटर झालेली आहे. जिल्ह्यातील गोदावरी इंद्रावती प्राणहिता या नद्यांना पूर परिस्थिती कायम असून मेडीगट्टा लक्ष्मी धरणातून याच्या आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मोहम्मद इरफान यांनी

  • 02 Aug 2026 09:50 AM (IST)

    साई मंदिराजवळील दोन स्वतंत्र मंदिरे उभारणार

    साई मंदिराजवळील लेंडी बागेत श्रीराम आणिर श्रीकृष्णासाठी स्वतंत्र मंदिरे उभारण्यात येणार आहे. साईबाबांच्या काळातील ऐतिहासिक मूर्तींना स्थायी स्थान मिळणार आहे.   108 वर्षांचा ‘वनवास’ अखेर संपणार  आहे. भाविक आणि मुर्ती भेट देणा-या नागपुर येथील बुटी परिवाराची इच्छा पूर्ण होणार आहे.

  • 02 Aug 2026 09:40 AM (IST)

    Sangli : कृष्णाची पातळी पोहोचली 29. 5 इंच फुटांवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

    कोयना आणि वारणा धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामध्ये कमालीची वाढ होतेय. सांगलीची कृष्णा नदीची पातळी 29.5 फुटांवरती पोहोचलंय. त्याचबरोबर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आलंय

  • 02 Aug 2026 09:25 AM (IST)

    सोलापुरातील अनगरमध्ये संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध

    सोलापूरच्या अनगरमध्ये खासदार संजय राऊतांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध करण्यात आला आहे. भाजप पदाधिकारी अजिंक्यराणा पाटलांकडून निषेध करत पुतळ्याचे दहन करण्यात आलं आहे. मंत्री जयकुमार गोरेंवर संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती. त्याविरोधात अनगरमध्ये भाजपकडून निषेध आंदोलन करण्यात आले.

  • 02 Aug 2026 09:13 AM (IST)

    Dhule : धुळ्यातील नकाणे तलाव तुडुंब, पाणीपुरवठ्याची चिंता मिटली

    धुळे शहराला दिलासा मिळाला आहे. नकाणे तलाव तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याची चिंता मिटली आहे. धुळे शहराला पाणीपुरवठा करणारा नाकाणे तलाव १०० टक्के भरून वाहू लागला आहे. गेल्या दोन दिवसांतील मुसळधार पावसामुळे अवघ्या चार दिवसांत तलावातील पाणीसाठा ६२ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनावरून अद्याप आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल राज ठाकरेंनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर टीका केली. विरोधकांनी सोशल मीडियावरील ट्रोलिंगवर पंजप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष घालावे अशी सूचना केली. मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन तरुणांशी संवाद साधत आहे. तर काल त्यांनी आंदोलकांनाही माफ केलं. त्यानंतर अभिजीत दीपकेंनी अधिकृतरित्या विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. विरोधकांकडून मोदींवर टीका होत असताना आज संजय राऊत यांनीही पक्षाच्या मुखपत्रातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच राजकारणातील उलटसुलट चर्चांवरही भाष्य केलं. यासह राज्यातील सर्व घटनांचे अपडेट्स जाणून घ्या

Published On - Aug 02,2026 9:08 AM

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन