AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Murder Update : भटक्या कुत्र्यांना खायला दिले प्रेयसीचे तुकडे ! दुर्गंध लपवण्यासाठी एअर फ्रेशनरचा वापर, पोलिसांनी केले अनेक खुलासे

पोलिसांनी आरोपीच्या फ्लॅटचे भयानक दृश्य देखील वर्णन केले आहे. दुर्गंधी कमी करण्यासाठी सगळीकडे एअर फ्रेशनर फवारण्यात आला होता.

Mumbai Murder Update : भटक्या कुत्र्यांना खायला दिले प्रेयसीचे तुकडे ! दुर्गंध लपवण्यासाठी एअर फ्रेशनरचा वापर, पोलिसांनी केले अनेक खुलासे
| Updated on: Jun 08, 2023 | 12:39 PM
Share

मुंबई : आधी वसतीगृहातील तरूणीच्या हत्येचे प्रकरण आणि नंतर मीरा रोडमध्ये लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेची पार्टनरने हत्या (live in partner murder) केल्यामुळे मुंबई हादरली आहे. या हत्येप्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याबाबतही (murder updates) अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने प्रेयसीच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्यांना खायला घालत असल्याचेही समजते. याशिवाय मृतदेहाचे अवयव ड्रेनेज लाईनमध्ये फेकल्याची शक्यताही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून याबाबत नया नगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गीता आकाशदीप सोसायटीतील सातव्या माळ्यावर मनोज साहनी (वय 56) आणि सरस्वती वैद्य ( वय 32)एकत्र राहत होते. दोघेही लिव्ह इनमध्ये होते. गेल्या तीन वर्षापासून हे दोघे या सोसायटीत भाड्याने राहत होते. मात्र, दोघांचे कडाक्याचे भांडण झाल्याने मनोजने सरस्वतीची हत्या केल्याचे पोलीसांनी सांगितलं.

दरम्यान, पोलिसांनी आरोपीच्या घरातील भीषण दृश्याचे वर्णन केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराचा दरवाजा उघडताच प्रचंड दुर्गंधी येत होती. तो वास इतका भयानक होता की तिथे उभं राहणंही कठीण झाले होते. यानंतर पोलीस आत शिरताच त्यांना मानवी शरीराचे तुकडे दिसले. ते पाहून सर्वच अवाक् झाले. हॉलमध्ये त्यांना झाडं कापणारे मशीन, कटर दिसले. तर बेडरूममध्ये बेडवर काळ्या रंगाच्या पिशव्या पसरलेल्या दिसत होत्या.

बादलीत होते शवाचे तुकडे

यानंतर स्वयंपाकघराचा दरवाजा उघडला असता तेथे तीन बादल्या ठेवल्या होत्या, त्यात मृतदेहाचे तुकडे ठेवलेले दिसले. आजूबाजूला रक्त दिसत होते. याशिवाय बेडरूममध्ये मुलीचे केस पडलेले आढळून आले. मृतदेहाचा दुर्गंध पसरू नये यासाठी घरात बरेच एअर फ्रेशनर फवारलेले होते. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना पाहून पोलिसांची मतीही गुंग झाली.

मृतदेहाचे तुकडे कूकरमध्ये उकळले

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी मनोज आणि सरस्वती यांच्यादरम्यान कोणत्या तरी कारणावरून भांडण झाले होते. प्रकरण इतके वाढले की मनोजने रागाच्या भरात सरस्वतीची हत्या केली. यानंतर त्याने तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि नंतर ते प्रेशर कुकरमध्ये उकळले. मात्र, हत्येमागचे खरे कारण काय होते, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पोलिसांना मिळाले 12-13 तुकडे

पोलिसांना मनोजच्या फ्लॅटमधून केवळ 12-13 मृतदेहांचे तुकडे सापडले. मनोज हे तुकडे उकळून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पॅकेटमध्ये भरत होता. उर्वरित काही तुकडे त्याने आधीच निकाली लावले होते. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आलं. फ्लॅटमधील इतर पुरावेही गोळा केले आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती मिळणार आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.