AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच त्रास..आधी धमकी, नंतर थेट ..

या घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशन गाठले. भांडूप पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकत अटक केली

Mumbai Crime : जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच त्रास..आधी धमकी, नंतर थेट ..
| Updated on: Oct 17, 2023 | 4:25 PM
Share

मुंबई | 17 ऑक्टोबर 2023 : प्रेम ही (love) अतिशय सुरेख भावना आहे. पण सर्वांनाचं त्याचं प्रेम मिळतं असं नाही. काही जणांना प्रेमाची साथ आयुष्यभर मिळते, तर काहींचा प्रवास अर्धवट थांबतो. काहींना प्रेमात नकारही मिळतो. पण हा नकार पचवणही तितकंच महत्वाचं आहे. आपल्याला जी व्यक्ती आवडे, तिलाही आपण आवडलोच पाहिजे, असा अट्टाहास प्रेमात उपयोगाचा नाही. पण सगळ्यांनाच नकार पचवता येत नाही. त्यातूनच एखादी दुर्घटना किंवा नकोसा प्रकारही घडू शकतो.

असाच एक प्रकार मुंबई शहरातही घडला. चार वर्षांची ओळख, त्यानंतर ते एकत्र रिलेशनशिपमध्येही होते. मात्र काही काळानंतर तरूणीला त्या तरूणासोबत राहण्यात रस नव्हता. पण  तिचा नकार न पचवता आल्याने तरूणाने तिच्यावर थेट हल्लाच केला. जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तिलाच त्रास देण्यासाठी त्याचे हात कसे धजावले असा प्रश्न सध्या सर्वांना पडला आहे.

मुंबईतील या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरलं आहे. 15 ऑक्टोबरच्या रात्री एका 28 वर्षांच्या तरूणाने 21 वर्षांच्या पीडितेवर जीवघेणा हल्ला केला. त्याने तिच्या गळ्यावर वार करत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पीडित तरूणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कथित आरोपी आणि 21 वर्षीय पीडित तरुणी 2019 पासून एकमेकांना ओळखतात आणि ते एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर त्या मुलीला त्याच्यासोबत नात्यात राहण्याची इच्छा नव्हती. तिने त्याल तसं सांगितलंही , मात्र त्या तरूणीचा नकार त्याला पचवता आला नाही. हे नातं कायम राखलं नाही तर तुझे व्हिडीओ ऑनलाइन पोस्ट करेन, अशी धमकी त्याने तरूणीला दिली. आरोपी आणि पीडित तरूणी हे दोघेही जवळपास रहायचे असे समजते.

15 ऑक्टोबर रोजी त्या दोघांनीही शेवटचं भेटायचं ठरवलं. त्याप्रमाणे ते भेटले, त्यांनी अंधेरीतील एका हॉटेलमध्ये रूमही बूक केली. मात्र तेथे त्या तरूणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आरोप लावण्यात आला आहे. त्यानंतर दोघेही तेथून एका रिक्षात बसून भांडूपच्या दिशेने निघाले. गांधीनगर जवळ त्या तरूणाने तरूणीच्या गळ्यावर वार करत तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरूणीला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या घटनेनंतर पीडित तरूणीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. भांडूप पोलिसांनी आरोपी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकत अटक केली.

28 वर्षीय तरुणावर कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 376 (बलात्कार), 363 (अपहरण), 323 , 504 आणि 50 या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?