आई होणार म्हणून ती आनंदात होती, पण तिचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, पतीनेच…

लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून नाराज पती पत्नीचा छळ करत होता. बाळा आल्यानंतर तरी पती शांत होईल आणि सर्व काही सुरळीत होईल असे तिला वाटत होते. पण तिच्या पदरी निराशाच पडली.

आई होणार म्हणून ती आनंदात होती, पण तिचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही, पतीनेच...
हुंड्यासाठी विवाहितेचा पतीकडून छळImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 22, 2023 | 7:04 PM

मुंबई : लग्नात हुंडा दिला नाही म्हणून पतीने विवाहितेला अमानुष मारहाण केल्याची घटना मुंबईतील चेंबूर परिसरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे विवाहिता सहा महिन्यांची गरोदर होती. या मारहाणीत तिच्या पोटातील बाळ दगावले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ सुर्यकांत पोळ असे आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीविरोधात कलम 316, 323, 498ए आणि 504 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास सुरु असून, आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

हुंड्यासाठी पतीकडून पत्नीचा छळ

सौरभ आणि पीडितेचं 2022 मध्ये लग्न झालं होतं. मात्र लग्नात महिलेच्या घरच्यांकडून हुंडा मिळाला नसल्याने सौरभ तिचा छळ करत होता. यानंतर सहा महिन्यांनी महिला गरोदर राहिली. पीडितेला वाटले बाळ आल्यानंतर सर्वकाही ठीक होईल. पण तिचा अत्याचार थांबत नव्हता. पतीकडून तिचा छळ वाढतच होता. पती दररोज तिला मारहाण करायचा.

पत्नीला अमानुष मारहाण

सौरभ घरी दारु पिऊन आला होता. पत्नीने त्याला दारु का प्यायला विचारताच त्याने तिला तोंडावर आणि पोटावर पंच मारण्यास सुरुवात केली. तसेच लाथाही घातल्या. त्याच्या बहिणीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकायला तयार नव्हता. त्याने तिला मारहाण सुरुच ठेवली. यानंतर रात्री बेडरुममध्ये झोपायला गेल्यानंतरही त्याने तिच्या पोटावर मारहाण केली. दुसऱ्या दिवशी महिलेला पोटात दुखू लागले आणि ब्लिडिंग होऊ लागले. तिने पतीला याबाबत सांगितले, मात्र त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले.

हे सुद्धा वाचा

मारहाणीमुळे महिलेचा गर्भपात

पीडितेने आपल्या पालकांना याबाबत सांगितले. यानंतर तिचे आई-वडिल तिच्या सासरी आले असता सौरभने त्यांना माघारी पाठवले. मात्र तिच्या वेदना थांबण्याचे नाव घेत नव्हत्या. वेदना असह्य होत असल्याने तिने पुन्हा आई-वडिलांना सांगितले. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला कल्याण येथे माहेरी नेत तेथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तिचा गर्भपात झाला. यानंतर महिलेने पोलिसात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरुन पतीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.