AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 पिस्तुल, 21 काडतूस, हॉटेलमधून पाच जणांना उचललं, मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्लानिंगचा पर्दाफाश

गुन्हा घडण्यापूर्वीच मुंबई पोलिसांनी एक मोठं कारस्थान उधळून लावलं आहे. एका हायप्रोफाईल व्यक्तीच्या हत्येचं आरोपींनी प्लानिंग केल्याची माहिती आहे. थेट हॉटेलवर धाड टाकून मुंबई पोलिसांनी आरोपींना उचललं.

7 पिस्तुल, 21 काडतूस, हॉटेलमधून पाच जणांना उचललं, मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्लानिंगचा पर्दाफाश
Mumbai HotelImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Apr 04, 2025 | 1:06 PM
Share

मुंबई पोलिसांनी एक मोठं कारस्थान उधळून लावलं आहे. गुन्हा घडण्यापूर्वीच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मागच्यावर्षी वांद्रे भागात माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची निर्घृण हत्या झाली होती. पुन्हा अशी घटना घडू नये, यासाठी मुंबई पोलीस अलर्ट मोडवर आहेत. मुंबई पोलिसांनी एका बड्या सेलिब्रिटीच्या हत्येचा कट उधळून लावला आहे. अंधेरी पश्चिमेला असेलल्या ‘द प्लॅटिनम’ हॉटेलमधून मुंबई पोलिसांनी पाच जणांना अटक केली. हे आरोपी बाहेरुन आल्याची माहिती मिळत आहेत. एका हायप्रोफाईल व्यक्तीच्या हत्येचं त्यांनी प्लानिंग केल्याची माहिती आहे. हे पाचही आरोपी 22 ते 27 वयोगटातील आहेत.

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने 28 मार्च रोजी अंधेरी पश्चिमेला असेलल्या ‘द प्लॅटिनम’ हॉटेलमधून पाच जणांना ताब्यात घेतलं. हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार येथून हे आरोपी आले होते. एका बड्या व्यक्तीच्या हत्येच्या प्लानिंगसाठी ते या हॉटेलमध्ये उतरले होते. त्या व्यक्तीला कसं मारायच? याचं ते प्लानिंग करत होते. पण गुन्हे शाखेने त्यांचा डाव उधळून लावला.

बिश्नोई गँगच कनेक्शन

पोलिसांनी 28 तारखेला पाच आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सात पिस्तुल आणि 21 काडतूस जप्त केली आहेत. हे गुन्हेगार ज्या राज्यातून आले, त्या भागात त्यांच्यावर गुन्हे दाखल होते. हे पाचही आरोपी बिश्नोई टोळीशी संबंधित असण्याची शक्यता आहे. पोलिसांकडून कसून तपास सुरु आहे. बिश्नोई गँगने आतापर्यंत अभिनेता सलमान खानला अनेक धमक्या दिल्या आहेत. मागच्यावर्षी बाब सिद्दीकी यांची हत्या घडवून आणली. या गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात बसून हे सर्व गुन्हे घडवून आणतो.

Follow Us
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी