Mumbai Crime : झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

दुकानाबाहेर झोपण्याच्या वादातून एका तरूणाला चक्क त्याचा जीव गमावावा लागल्याची खळबळजनक घटना मुंबईत उघडकीस आली. छोट्याशा मुद्यावरून झालेल्या वादाचा एवढा हिंसक शेवट झाल्याने संपूर्ण शहर हादरलं.

Mumbai Crime : झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 9:41 AM

मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळयांनाच माहीत आहे. पण आता शहरातील गुन्हेगारीही इतकी वाढली आहे की निवांत झोप लागणंही दुरापास्त झालं आहे. एका दुकानाबाहेर झोपण्याच्या वादातून एका तरूणाला चक्क त्याचा जीव गमावावा लागल्याची खळबळजनक घटना मुंबईत उघडकीस आली. छोट्याशा मुद्यावरून झालेल्या वादाचा एवढा हिंसक शेवट झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे.

अखेर या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. सुनील लोंबरे असे मृत तरूणाचे नाव असून सागर पवार (45) आणि प्रभू भोईर (38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यासंदर्भात व्हीपी रोड पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत तरूण सुनील लोंबरे हा लोडरचे काम करत होता. घटनेच्या दिवशी तो दुकानाबाहेरील फलाटावर झोपण्यासाठी गेला होता. मात्र सागर पवार (45) आणि प्रभू भोईर (38) हे दोघे आधीच त्या जागी बसलेले होते आणि दोघेही दारूच्या नशेत होते. सुनील याने त्या दोघांना तेथून हटण्यास सांगितले. मी इथे नेहमी झोपतो, ही माझी जागा आहे, असा दावा त्याने केला. तसेच त्याने सागर आणि प्रभू या दोघांना झोडपून काढण्याचाही प्रयत्न केला. मात्र ते दोघेही तिथून हलले नाहीत.

बघता बघता हा वाद चांगलाच पेटला. आणि संतापलेल्या पवार व भोईर यांनी सुनील याला बेदम मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर आरोपी भोईर याने खिशातून दोरी कापायचे कटर काढले आणि रागाच्या भरात सुनील लोंबरे याच्या मानेवर जोरात वार केले. गंभीर जखमी झालेल्या सुनीलच्या शरीरातून बराच रक्तस्त्राव होऊ लागला. हे पाहून दोन्ही आरोपी तेथून फरार झाले. गस्तीवरील पोलिसांनी सुनील याला जखमी अवस्थेत पाहिले आणि तातडीने जेजे रुग्णालयात नेले. मात्र तेथे उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सुनीलवर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी पवार आणि भोईर यां दोघांना घटनेच्या काही तासांतच अटक करण्यात आल्याचे वरिष्ठ निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले. सुरुवातीला, त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र सुनील लोंबरे याचे निधन झाल्यावर त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Non Stop LIVE Update
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर
मोदी नाहीतर शाह होणार PM? ठाकरेंवरील 'त्या' टीकेवर राऊतांच प्रत्युत्तर.
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच
बापरे... अशी गारपीट तुम्ही कधी पहिलीये? 15 तासांनंतरही गारांचा खच तसाच.
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?
ST स्टँड आहे की एअरपोर्ट....अजितदादांकडून कुठं उभारलंय भव्य बस स्थानक?.
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
रणवीर सिंगला अलिबागची भुरळ! क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात.
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी
चव्हाण भाजपात अजगराएवढे मोठे होतात का?, भाजप खासदाराची तुफान टोलेबाजी.
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक
भाजप खासदाराची बहिण काँग्रेसच्या वाटेवर? लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक.
मनसेचे वसंत मोरे पुन्हा नाराज? शरद पवारांच्या सोबतच्या भेटीच कारण काय?
मनसेचे वसंत मोरे पुन्हा नाराज? शरद पवारांच्या सोबतच्या भेटीच कारण काय?.
कुणामागे कोण? आरोपांमुळे खळबळ तर शरद पवार- टोपेंकडे फडणवीस यांचं बोट?
कुणामागे कोण? आरोपांमुळे खळबळ तर शरद पवार- टोपेंकडे फडणवीस यांचं बोट?.
मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार? SIT च्या फेऱ्यात मराठ्यांचं आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांना अटक होणार? SIT च्या फेऱ्यात मराठ्यांचं आंदोलन.
गौतमी पाटील हिला भाजप तिकीट देणार? सुषमा अंधारेंनी कुणावर डागली तोफ?
गौतमी पाटील हिला भाजप तिकीट देणार? सुषमा अंधारेंनी कुणावर डागली तोफ?.