Mumbai Threat | मुंबईला धमकी देणारा मेसेज पाकिस्तानाचा! वरळीत गुन्हा, क्राइम ब्राँच आणि एटीएस तपास करणार, मुंबई पोलिस आयुक्तांची माहिती

मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार अशी धमकी देणाऱ्या मेसेजविषयी माहिती देताना पोलिस आयुक्त म्हणाले, ' सदर माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या क्राइम ब्रांचने कारवाई सुरु केली. सखोल चौकशी, कोणता नंबर याबाबत आम्ही रात्रभर कारवाई करत आहोत.

Mumbai Threat | मुंबईला धमकी देणारा मेसेज पाकिस्तानाचा! वरळीत गुन्हा, क्राइम ब्राँच आणि एटीएस तपास करणार, मुंबई पोलिस आयुक्तांची माहिती
विवेक फणसाळकर, मुंबई पोलीस आयुक्तImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 2:56 PM

मुंबईः मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला (Terror Attack) करणार असल्याची धमकी देणारा मेसेज पाकिस्तानातून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस आय़ुक्त विवेक फणसाळकर (Vivek Fansalkar) यांनी सदर प्रकरणी नुकतीच पत्रकार परिषदेत माहिती दिली. मुंबईवर २६-११ सारखा दहशतवादी हल्ला करणार, अशी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात येईल, अशी माहितीही फणसाळकर यांनी दिली. काल रात्री मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांच्या कंट्रोल रुमवर धमकीचे मेसेज मिळाले. मेसेज करणाऱ्याने मी पाकिस्तानातून बोलत असून माझ्यासोबत काही भारतीयदेखील आहेत,असेही संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीने लिहिले आहेत. शुक्रवारी रात्री कंट्रोल रुमला हे मेसेज आल्यानंतर मुंबईतीव अवघी पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे. मुंबईकरांच्या सुरक्षिततेला आव्हान देणारा कोणताही कॉल आम्ही दुर्लक्षित करणार नाहीत, तो गांभीर्यानेच घेत आहोत. दहशतवादविरोधी पथकासोबत आम्ही वेळोवेळी माहिती शेअर करत आहोत, असं आश्वासन विवेक फणसाळकर यांनी दिलं.

पोलिस आयुक्त काय म्हणाले?

मुंबईवर दहशतवादी हल्ला होणार अशी धमकी देणाऱ्या मेसेजविषयी माहिती देताना पोलिस आयुक्त म्हणाले, ‘ सदर माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या क्राइम ब्रांचने कारवाई सुरु केली. सखोल चौकशी, कोणता नंबर याबाबत आम्ही रात्रभर कारवाई करत आहोत. या संबंधाने मुंबईच्या वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दाखल झाल्यानंतर तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात येईल. आमची जी माहिती आहे, ती एटीएस पथकासोबत शेअर करत आहोत. बाकी एजन्सीच्या संपर्कात आहोत. यात ज्यांनी हे मेसेज केले आहेत. सर्व अँगल्स तपासत आहोत. जे नंबर्स चॅटमधून डिस्क्लोज होत आहेत, ते लोक कोण आहोत, त्याचा तपास सुरु आहे. मुंबईकरांना आश्वासन देतो की मुंबई पोलिस अशा प्रकारचा कोणताही कॉल लाइटली घेत नाही. अत्यंत गंभीरपणे याकडे पहात आहोत. मुंबईकरांना कोणतीही क्षती पोहचणार नाही, यासाठी आम्ही काम करत आहोत. मुंबईला उडवून देण्याची भाषा, कसाब आणि अल जवाहिरीसारख्या व्यक्तींचाही उल्लेख या संदेशांमध्ये आहे. या संदेशांमधून त्यांनी काही नंबर्स दिलेत. ते भारताचे आहेत. या सर्वांचा तपास आम्ही करत आहोत.

धमकीचा मेसेज काय?

मुंबईवर 26-11 सारखा दहशतवादी हल्ला होणार आहे, अशी धमकी देणारा मेसेज पुढील प्रमाणे आहे…. जी मुबारक हो! मुंबईवर हल्ला होणार आहे. 26-11 हल्ल्याची आठवण करून देणारा असा हल्ला असेल. मुंबईला उडवण्याची तयारी सध्या सुरु आहे. मुंबई उडवून देण्याची यूपी एटीएसची इच्छा आहे. मी पाकिस्तानातून असून माझ्यासोबत काही भारतीय आहेत. त्यांना मुंबई उडवायची आहे. तोहीद, इनाम अली, नदीम, आसिफ ज्यांना मामा नावानंही ओळखतात. खर्रस कुरेशी, मोहम्मद आसिफ, आमीर सिद्दीक, रिजवान हा मुजफ्फरनगरचा आहे. शादाब सर ऑफ सरफराज, मोहम्मद रियाज, मोहम्मद यासीर, मोहम्मद फैयाज आदी माणसं मला मदत करतील. मुंबई उडवण्याची तयारी पूर्ण झाली असून आता फक्त काही वेळ बाकी आहे. माझं लोकेशन इथे अॅड्रेस होईल, मात्र काम मुंबईत होणार. आमच्या लोकांचं कोणतंही ठिकाण नसतं… लोकेशन तुम्हाला आउट ऑफ कंट्री ट्रेस होईल, हल्ला मुंबईत होणार….

Non Stop LIVE Update
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.