AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईच्या हिट अँड रन केसमध्ये दोघांच्या मुसक्या आवळल्या, मिहिरला पकडण्यासाठी 6 पथके; गर्लफ्रेंडच्या चौकशीतून…

वरळीमध्ये रविवारी पहाटे झालेल्या हिट अंँड रन केसमध्ये पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्यात. अद्याप मुख्य आरोपी मिहिर शाह हा फरार असून पोलिसांनी त्याच्या गर्लफ्रेंडला चौकशीसाठी बोलावलंं आहे.

मुंबईच्या हिट अँड रन केसमध्ये दोघांच्या मुसक्या आवळल्या, मिहिरला पकडण्यासाठी 6 पथके; गर्लफ्रेंडच्या चौकशीतून...
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 07, 2024 | 10:53 PM
Share

मुंबईमधील वरळी येथील हिट अँड रन केसमध्ये पोलिसांच्या कारवाईला वेग येताना दिसत आहे.  रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास बीएमडब्ल्यू गाडीने दुचाकीवर चाललेल्या दाम्पत्याला धडक दिली.  त्यानंतर गाडीवरील महिलेला काही किलोमीटर फरफटत नेलं. बीएमडब्ल्यू कार चालकाचं नाव मिहिर शाह असून तो फरारा झालाय. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सहा पथके रवाना झाली आहेत. तर आरोपीच्या गर्लफ्रेंडला चौकशीसाठी बोलावलं असून तिचीही चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केलीये.

पोलिसांनी या प्रकरणामध्ये राजेश शाह आणि त्यांचा ड्रायव्हर राजेंद्रसिंग बिडावत याला चौकशीसाठी बोलावलं होतं. पोलीस चौकशीवेळी अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर गाडी चालवत असल्याचं राजेश शाह यांनी सांगितलं. मात्र अपघात झालेल्या दाम्पत्यामधील पतीने फरार असलेला मिहिर शाह हाच गाडी चालवत असल्याचं म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईमधील वरळी येथे सकाळ पहाटे 5 वाजता प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा हे मच्छीमार दाम्पत्य गाडीवरून चालले होते. ससून डॉक बंदराकडून ते मासे घेऊन येत होते. या दाम्पत्याला बीएमडब्ल्यू गाडीने जोरदार धडक दिली. धडक दिलेल्या गाडीमध्ये मिहिर शाह आणि त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. धडक दिल्यावर दाम्पत्य खाली पडले, त्यानंतर कावेरी नाखवा यांची साडी कारच्या चाकात अडकली त्यानंतर महिलेला काही किलोमीटर फरफटत नेलं. महिलेचे पती प्रदीप नाखवा यांनी सांगितलं की, त्यांच्या पत्नीच्या अंगावरील कपडेही फाटले होते.  वरळीच्या कोळीवाड्यात नाखवा मच्छीमार दाम्पत्य राहतं.

दरम्यान, फरार आरोपी मिहिर शाह याचा पोलीस शोध घेत आहेत. अपघात झाला त्यावेळी त्याने ड्रिंक केलेली का? या अंगाने पोलीस तपास करतायेत. सीसीटीव्ही समोर आलेत त्यामध्ये मिहिर शाह चार मित्रांसह मर्सिडीज कारमधून उतरताना आणि कारमध्ये बसताना दिसत आहे. हे सीसीटीव्ही फुटेज जुहू व्हॉईस ग्लोबल तपस बारच्या बाहेरचे आहे.

Follow Us
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी
खाडकन उघडले धरणाचे 4 दरवाजे, तापी नदीपात्रात भयंकर विसर्ग सुरू, काळजी घेण्याचे आवाहन!
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर
राजकारणात मोठा ट्विस्ट! ठाकरे सेना-शिंदे सेना-भाजप एकाच मंचावर; औरंगाबादमध्ये नवं समीकरण