AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Wardha : वडिलांशी वाद का घातला? जाब विचारणेही पडले महागात, तरुणाचा खून, महिलांच्या चित्रिकरणामुळे उलगडले गूढ

मारहाणीनंतर आशिष हा रक्तबंबाळ अवस्थेत आशिष जमिनीवर निपचीत पडून होता. घटनेची माहिती मिळताच त्याच्या दोन मित्रांनी दुचाकीवरुन सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले पण आशिषचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

Wardha : वडिलांशी वाद का घातला? जाब विचारणेही पडले महागात, तरुणाचा खून, महिलांच्या चित्रिकरणामुळे उलगडले गूढ
वर्ध्यात तरुणाचा खून Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 01, 2022 | 3:43 PM
Share

वर्धा : वडिलांशी वाद का घातला ? याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या 27 वर्षीय तरुणाचा (Wardha) वर्ध्यात खून झाला.शहरातील स्टेशनफैल परिसरात ही घटना घडली असून एकच खळबळ घडली आहे. (for trivial reasons) क्षुल्लक कारणावरुन (Young  Man) तरुणाला दगडाने ठेचून मानेवर धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली आहे. आशिष आनंद रणधीर असे या मृत तरुणाचे नाव असून वडिलांबरोबर भांडण का केले म्हणून तो जाब विचारण्यासाठी गेला असता शेजारी राहणाऱ्याच शुभंम जयस्वाल, लक्ष्मीनारायन जयस्वाल आणि आदित्य जयस्वाल यांनी त्याचा धारदार शस्त्राने खून केला. हा सर्व प्रकार त्या परिसरातील महिलांनी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यामुळे नेमका प्रकार काय झाला हे पोलिसांच्या निदर्शास आले आहे.  याप्रकरणी वर्धा शहर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नेमकी घटना काय घडली ?

वर्धा शहरातील स्टेशनफैल परिसरात मृत आशिष हा आपल्या वडिलांसमवेत वास्तव्यास होता तर त्यांच्या शेजारी शुभम जयस्वाल ही राहत होता. आशिषचे वडील आनंद रणधीर यांचा ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास आरोपी शुभम जयस्वाल याच्याशी वाद झाला होता. दरम्यान, आशिषने मध्यस्थी केली होती तेव्हा तोंडी वाद झाला होता. रात्रीच्या सुमारास आशिष हा घरा समोरील चौकात गेला असता तेथे पुन्हा आरोपी शुभमने वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. संतापलेल्या शुभम जयस्वाल याने काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली.तेवढ्यातच शुभमचे वडील लक्ष्मीनारायण तेथे आले आणि त्यांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी शुभंमचा मावसभाऊ आदित्य यानेही त्यांना मदत केली. शिवाय पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही आदित्य याने केला होता. मात्र, हा प्रकार महिलांना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याने त्याचाही घटनेमागे हात असल्याचे निष्पन्न झाले. आशिषला जमिनीवर पाडून त्याच्यावर दगडाने प्रहार केला त्यानंतर चक्क धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन तेथून पळ काढला.

मित्रांचे प्रयत्नही निष्फळ

मारहाणीनंतर आशिष हा रक्तबंबाळ अवस्थेत आशिष जमिनीवर निपचीत पडून होता. घटनेची माहिती मिळताच त्याच्या दोन मित्रांनी दुचाकीवरुन सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले पण आशिषचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्याच्या मित्रांनी वेळेत उपचार व्हावे यासाठी प्रयत्न केले पण धारदार शस्त्राने मानेवरती वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

शहरातील स्टेशनफैला येथे घडलेल्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप, पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. त्यांनी पंचनामा करुन प्रकरणाची सखोल चौकशी केली. रात्रीच तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. आरोपींविरुद्ध जातीवाचक शिवीगाळ आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप करीत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट
आमचा तेजस्वी सूर्य अस्ताला गेला! रोहित पवारांचं भावनिक ट्विट.
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?
अजित पवारांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार?.