Nagpur : नागपुरातील जळीतकांड प्रकरण, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मित्रावर गुन्हा

| Updated on: Mar 25, 2022 | 8:09 AM

नागपुरातील निकीता चौधरी जळीतकांड प्रकरणात मोठी बातमी आहे. निकीता चौधरी जळीतकांड प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्रानेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur : नागपुरातील जळीतकांड प्रकरण, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मित्रावर गुन्हा
नागपूर जळीतकांड प्रकरण
Image Credit source: tv9
Follow us on

नागपूर : निकीता चौधरी जळीतकांड प्रकरणात मोठी बातमी आहे. निकीता चौधरी जळीतकांड प्रकरणात अखेर गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे. मित्रानेच आत्महत्येस (suicide) प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल बांगरे या आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. जळीतकांड प्रकरणात सात दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘निकीतावर अत्याचार झाला नाही, शरीरावर मारहाणीच्या खुना नाही’ असं वैद्यकीय अहवालात (Report) स्पष्ट करण्यात आलंय. नागपूरमध्ये वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी परिसरात 15 मार्चला एका  23 वर्षीय निकिता चौधरी या तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. निकिताचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने प्रथमदर्शनी तिची हत्या झाली असावी, असा संशय त्यावेळी व्यक्त केला जात होता.

तपासाला आला वेग

निकिता चौधरीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत तपास सुरू केला होता. निकिता गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले असावे, असाही संशय शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात निकिताची हत्या झाली नसून तिने स्वतः आत्महत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झालेला होता. अखेर जळीतकांड प्रकरणात सात दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ‘निकीतावर अत्याचार झाला नाही, शरीरावर मारहाणीच्या खुना नाही’ असं वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आलंय.

वेगवेगळे संशय होते

निकिताला एक प्रियकर होता. निकिता आणि तिच्या प्रियकरांमध्ये नेहमी भांडण होत असायचे  त्यामुळे मध्यंतरी त्यांच्या संबंधांमध्ये दुरावा आला होता. या कारणाने निकिता मानसिक तणावात होती, सोबत निकिता ही उच्चशिक्षित असून तिला अपेक्षा नुसार नोकरी देखील मिळत नव्हती. ते देखील एक कारण पुढे आले होते. त्यातूनच तिने आत्महत्या केली असल्याचा संशय त्यावेळी पोलिसांनी व्यक्त केला होता. तर त्यानंतरचे काही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले होते.

सात दिवसानंतर गुन्हा

जळीतकांड प्रकरणात सात दिवसानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निकिता चौधरीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्र फिरवत तपास सुरू केला होता. दरम्यान, ‘निकीतावर अत्याचार झाला नाही, शरीरावर मारहाणीच्या खुना नाही’ असं वैद्यकीय अहवालात स्पष्ट करण्यात आलंय. नागपूरमध्ये वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुराबर्डी परिसरात 15 मार्चला एका  23 वर्षीय निकिता चौधरी या तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता.

इतर बातम्या