AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर प्रदेशातून नागपुरात आले, एटीएममध्ये घुसले अन्… सीसीटीव्हीमध्ये जे कैद झालं त्याने सर्वांनाच धक्का

चोरीसाठी हे गुन्हेगार काय शक्कल लढवतील, काही नेम नाही. एटीएम फोडून चोरी करणाऱ्या अशाच दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चोर पार उत्तर प्रदेशातून नागपूरमध्ये आले आणि तेथे चोरी केली. विविध राज्यातही त्यांनी अशीच चोरी केली आहे.

उत्तर प्रदेशातून नागपुरात आले, एटीएममध्ये घुसले अन्... सीसीटीव्हीमध्ये जे कैद झालं त्याने सर्वांनाच धक्का
| Updated on: Jan 25, 2024 | 1:04 PM
Share

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 25 जानेवारी 2024 : चोरीच्या, गुन्ह्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. चोरीसाठी हे गुन्हेगार काय शक्कल लढवतील, काही नेम नाही. एटीएम फोडून चोरी करणाऱ्या अशाच दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हे चोर पार उत्तर प्रदेशातून नागपूरमध्ये आले आणि तेथे चोरी केली , असं समोर आलं आहे. नागपूरमधील धंतोली पोलिसांनी त्या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

हे दोघेही कुख्यात गुन्हेगार असून त्यांनी वेगवेगळ्या राज्यात जाऊन अशा चोरी केल्याचं समोर आलं आहे. ते एटीएम कार्ड टाकून पैसे काढयचे, मात्र मशीन सुरू होताच त्याचं हूड काढून त्याच्यातून पैसे काढून घ्यायचे. मात्र बँकेत जाऊन पैसे निघालेच नाहीत असं सांगत बँकेतूनही पैसे उकळायचे. अशी युक्ती करून ते डबल पैसे उकळायचे. अखेर पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकून अटक केली.

असा उघडकीस आला गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील आहेत. ते एटीएम मध्ये कार्ड टाकून पैसे विड्रॉल करायचे मशीन सुरू होताच मशीनचं हूड काढून त्यातील पैसे काढून घ्यायचे आणि बँकेला आमचे पैसे निघालेच नाही असं क्लेम करत बँकेकडून पुन्हा पैसे घ्यायचे. नागपूरच्या अजनी चौकातील एटीएम मध्ये सुद्धा यांनी हाच प्रकार केला. एक भामटा एटीएममध्ये गेला, त्याने स्वतः जवळचं एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकलं. मात्र हे मशीन सुरू होताच त्याने आपल्याजवळ असलेलं इन्स्ट्रुमेंट वापरत एटीएम मशीनचं समोरचा हूड काढलं आणि पैसे काढून घेतले.

हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आणि बँक मॅनेजरने ते पाहिलं. त्यांनी तातडीने धंतोली पोलिसांना फोन करून या चोरीची माहिती दिली. पोलिसांनी लगेच तत्परता दाखवत घटनास्थळ गाठलं आणि एटीएम च्या बाहेर उभे असलेल्या दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. मात्र ते कोणतीही कबुली द्यायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी जेव्हा त्यांना हिसका दाखवला तेव्हाच त्या भामट्यांनी चोरीची कबुली दिली.

आपले नातेवाईक आणि स्वतःकडे असलेली कार्ड, अशी ८-१० एटीएम कार्ड सोबत ठेवायचे. त्या कार्ड्सचा वापर करत मशीन सुरू करायचे आणि आपल्या जवळ असलेल्या इन्स्ट्रुमेंटने एटीएमचं हूड काढून त्यातील पैसे काढून घ्यायचे. नंतर बँकेत जाऊन आपल्याला पैसे मिळालेच नाहीत असा कांगावा काढून डबल पैसे मिळवायचे अशी त्यांची मोडस ऑपरंडी ( गुन्ह्याची कार्यपद्धती) होती. याआधी देखील त्यांनी नागपूरमध्ये असाच कारनामा करत बरेच पैसे लुटले होते. एवढंच नव्हे तर विविध राज्यात जाऊन ते असेच गुन्हे करायचे, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. त्यांनी अजून कुठे असे गुन्हे केलेत, याचा पोलिस शोध घेत आहेत.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!