AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : काय डोकं आहे राव ! कोट्यवधींच सोनं लपवण्यासाठी तस्कराने लढवली अफलातून शक्कल

आधी कॅप्सूलमध्ये लपवून तर कधी सोन्याची पावडर चक्क बाळाच्या डायपरमध्ये ठेवून... सोन्यासाठी तस्कर रोज नवनव्या क्लुप्त्या वापरत असतात. मात्र नागपूरमध्ये सोनं तस्करांनी डोकं लढवत जी आयडिया वापरली ते ऐकून तर तुम्ही डोक्यालाच हात लावाल. असं डोकं कोणी लढवू शकेल याचा आपण विचारही करू शकणार नाही.

Nagpur Crime : काय डोकं आहे राव ! कोट्यवधींच सोनं लपवण्यासाठी तस्कराने लढवली अफलातून शक्कल
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 30, 2023 | 11:55 AM
Share

नागपूर | 30 सप्टेंबर 2023 : कॉफी प्यायला बहुतांश लोकांना आवडते. कडू-गोड चवीच्या कॉफीचे (coffee) घोट घेल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटतं. आजकाल कॉफी तयार करण्यासाठी नवनवी मशीन्सही आली आहेत. कॉफी मेकर मशीनही त्यापैकीच एक आहे. पण या कॉफी मेकर मशीनचा (coffee maker machine) वापर एका व्यक्तीने अशा कामासाठी केला ज्याचा कोणी विचारही करू शकणार नाही. त्याने असं नेमकं काय केलं की पोलिसांनी त्याला थेट तुरूंगातच टाकलं ? चला वाचूया.

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका इसमाच्या हालचाली संशयास्पद होत्या. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने अधिकाऱ्यांनी त्याला थांबवलं. त्याच्या सामानाची तपासणी केली असता, त्यांना त्यामध्ये कॉफी मेकर मशिन सापडलं. आणि त्याच्या आत तब्बल दोन कोटी रुपये किमतीचं सोनं (gold seized)) होतं. अखेर त्या इसमाला अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?

सीमाशुल्क विभागाने सोने (gold) तस्करीच्या एका धक्कादायक प्रकरणाचा भांडाफोड करत दोन कोटी रुपयांचे सोने जप्त केले. सीमा शुल्क विभागाच्या पथकाने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद अहमद नावाच्या आरोपीने कॉफी मेकर मशिनमध्ये प्रत्येकी १७४८ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे गोळे ( एकूण वजन 3 किलो 497 ग्राम सोने ) लपवून आणले होते. आरोपी मोहम्मद हा शारजाहून एअर अरेबियाच्या फ्लाइट क्र G9-415 ने पहाटे 4:10 च्या सुमारास नागपूप विमानतळावर उतरला. तो मूळचा उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे.

विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. त्यामुळे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला थांबवून सामानाची तपासणी केली. त्यामध्ये एक कॉफी मेकर मशिन आढळले. त्याचीही तपासणी करण्यात आली असता, त्यात १७४८ ग्रॅम वजनाचे दोन दंडगोलाकार आकाराचे सोन्याचे गोळे सापडले. त्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये इतकी आहे. कस्टमर अधिकाऱ्यांनी आरोपी मोहम्मद अहमद याला ताब्यात घेत अटक केली आहे.

दरम्यान सोनं तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दहा दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने मध्यपूर्व आशियामधून आलेल्या दोन प्रवाशांकडून कॅप्सूल मध्ये पेस्टच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणावर सोनं आढळून आलं होतं. त्यामुळे नागपूर सोने तस्करीसाठी एक नवा मार्ग बनत चालला आहे का असा संशय निर्माण झाला आहे.

बाळाच्या डायपरमधूनही केली सोन्याची तस्करी

तर काही दिवसांपूर्वीच मुंबई विमानतळावरही सोन्याची तस्करी करण्यात येत होती. पण कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तो डाव उधळला गेला. आरोपींनी कोट्यवधी रुपयांच्या सोन्याच्या पावडरीच्या तस्करीसाठी चक्क डायपरचा वापर केला. मुंबई विमानतळावर कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी सिंगापूरहून परत येणाऱ्या भारतीय कुटुंबाला अडवले. आणि त्यांच्याकडून सोन्याची पावडर जप्त केली. त्या प्रवाशांनी त्यांच्या अंतर्वस्त्रात आणि तीन वर्षांच्या लहान मुलाच्या डायपरमध्ये सोन्याची पावडर लपवून आणण्याचा प्रयत्न केला. अखेर त्यांचा डाव उधळत अटक करण्यात आली.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.