Nagpur Crime : 200 संशयितांची चौकशी, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांतर्फे ड्रोनचा वापर

पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम सुरू केली असून याप्रकरणी तब्बल 200 हून अधिक संशयितांची चौकशीही करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्रही जारी केले आहे.

Nagpur Crime : 200 संशयितांची चौकशी, आरोपीच्या शोधासाठी पोलिसांतर्फे ड्रोनचा वापर
Follow us
| Updated on: Oct 10, 2023 | 1:18 PM

नागपूर | 10 ऑक्टोबर 2023 : शहरातील गुन्ह्यांच्या वाढत्या (nagpur crime) प्रमाणाने नागरिक धास्तावले आहे. पोलिसांच्या कठोर कारवाईनंतरही गुन्हेगारांना वचक बसलेला नसून नागपूरमधील गुन्ह्यांचा आलेख चढताच आहे. त्यातच एका विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने शहरात खळबळ माजली. मात्र या गुन्ह्यातील आरोपीला शोधण्यासाठी नागपूर पोलिसांनी कंबर कसत (search operation to trace accused) मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू केली आहे.

हिंगना ठाणेअंतर्गत जामठा परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली होती. कॉलेजला निघालेल्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला निर्जनस्थळी रोखून नराधम आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरूणी ही हिंगणा येथे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहते आणि एका नामांकित विद्यालयात बी.टेकचे शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी ती सकाळी कॉलेजच्या दिशेने निघालेली असताना निर्जनस्थळी आरोपीने तिला रोखले. धारदार शस्त्र्याचा धाक दाखवत तो तिला जवळच्या झुडूपात घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी तेथून निघून गेल्यानंतर तिने पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली . पोलिसांनी आरोपीचे रेखाचित्र प्रसिद्ध केले आहे तसेच ड्रोनच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे.

 जंगलात घेतला शोध 

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी ड्रोनचा वापर सुरू केला आहे. पोलिसांनी नाईट व्हिजन कॅमेऱ्याने सज्ज असलेल्या ड्रोनच्या सहाय्याने वर्धा रोडवरील जामठा परिसरातील जंगलात आरोपींचा शोध घेतला. एखाद्या गुन्ह्यातील आरोपींचा माग काढण्यासाठी ड्रोनचा वापर करण्याची नागपूर शहर पोलीस दलातील ही पहिलीच घटना आहे. हिंगणा पोलिस आणि गुन्हे शाखेची 17 पथके या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत तब्बल दोनशेहून अधिक संशयितांची चौकशी देखील केली.

मात्र, अद्यापही पोलिसांना आरोपीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. आरोपी जंगल परिसरात लपल्याची शक्यता असल्याने ड्रोनद्वारे त्याचा शोध घेण्याचे पोलिसांनी ठरवले. नाईट व्हिजन कॅमेऱ्याने सज्ज असलेल्या ड्रोनच्या सहाय्याने जंगलातही शोधमोहिम राबवण्यात येत आहे. आरोपी शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.