Nagpur Crime : मोठमोठ्या नेत्यांशी संबंध असल्याचे सांगत जाळ्यात ओढायचा, मग गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे घेऊन लुटायचा !

| Updated on: Aug 16, 2023 | 4:29 PM

लोकांना बतावण्या करुन आपल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडायचा. अखेर त्याचा हा बनाव उघडकीस आला आणि आर्थिक गुन्हे शाखेने त्याला हेरला.

Nagpur Crime : मोठमोठ्या नेत्यांशी संबंध असल्याचे सांगत जाळ्यात ओढायचा, मग गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे घेऊन लुटायचा !
नागपूरमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर / 16 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारमध्ये मोठ्या पदावर असल्याचे सांगत तसेच मोठ्या नेत्यांशी संबंध असल्याचे सांगत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुंतवणुकीच्या नावाखाली आरोपीने नागरिकांकडून पैसे लुटल्याचे उघडकीस आले आहे. आरोपीने नागपुरातील गुंतवणूकदारांची एकूण 48.85 लाखांची फसवणूक केली आहे. अनिरुद्ध होसिंग असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला वाराणसी येथून अटक केली आहे. आरोपीवर यवतमाळसह अनेक शहरांत गुन्हे दाखल असल्याचंही उघड झालं आहे. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.

आपल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवायचा

अनिरुद्ध होसिंग हा आपण केंद्रीय पर्यटन विभागात डायरेक्टर जनरल पदावर असल्याची बतावणी करायचा. तसेच मोठ्या नेत्यांशी आणि कलाकारांशी संबंध असल्याचे सांगून जाळ्यात ओढायचा. मग गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करत त्यांच्याकडे आपल्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करण्यास सांगायचा. गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांचे पैसे घ्यायचा आणि परत करायचा नाही.

पैसे मिळाले नाही म्हणून गुंतवणूकदारांनी पोलिसात धाव घेतली

मात्र आरोपीने आश्वासन दिल्याप्रमाणे पैसे परत मिळाले नाही, गुंतवलेली रक्कमही परत मिळाली नाही. यामुळे गुंतवणूकदारांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. यानंतर आरोपीचा पर्दाफाश झाला. यानंतर आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी फसवणुकीची तक्रार दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला. तपासादरम्यान आरोपी वाराणसी येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक वाराणसी येथे दाखल झाले आणि आरोपीला सापळा रचून अटक केली. आतापर्यंत नागपुरातील गुंतवणूकदारांची 48 लाखांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

हे सुद्धा वाचा