कॉटन मार्केटमध्ये काम, रेल्वेस्थानक परिसरात झोपणे, शिवीगाळीवरून झालेला वाद जीवावर उठला

| Updated on: Jun 09, 2023 | 8:29 PM

सीसीटीव्हीवर घटना पाहून पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला. जखमीला रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

कॉटन मार्केटमध्ये काम, रेल्वेस्थानक परिसरात झोपणे, शिवीगाळीवरून झालेला वाद जीवावर उठला
Follow us on

सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : जितेंद्र आणि दिनेश सदाफुले हे दोघेही कॉटन मार्केटमध्ये काम करायचे. त्यानंतर रात्री झोपण्यासाठी रेल्वे स्थानक परिसर गाठायचे. रात्री दोघांचाही बोलण्यावरून वाद झाला. जितेंद्र याने दिनेशला आई बहिणीच्या शिव्या दिल्या. याचा याचा राग मात ठेवत जितेंद्रने दिनेशला दगडाने ठेचून चांगलीच मारहाण केली. ही घटना रेल्वे पोलिसांच्या लक्षात आली. सीसीटीव्हीवर घटना पाहून पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला. जखमीला रुग्णालयात दाखल केले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

आरोपीला सीसीटीव्हीच्या माध्यमातून अटक

नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर मध्यरात्री आपसी वाद झाला. या वादातून एकाने दुसऱ्याची हत्या केल्याची घटना पुढे आली. मृतकाने आरोपीला आई बहिणी वरून शिव्या दिल्या. याचा बदला घेण्यासाठी मृतकाच्या डोक्यावर आरोपीने दगड टाकून त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला सीसीटीव्हीच्या आधारे अटक केली.

 

हे सुद्धा वाचा

शिवीगाळ करणे जीवावर बेतले

आरोपी आणि मृतक हे दोघेही कॉटन मार्केट परिसरात काम करायचे. रेल्वे स्थानकाच्या परिसरात जाऊन झोपायचे. दोघांमध्ये फार काही ओळखी नव्हती. मात्र मध्यरात्रीच्या वेळी दोघेही एका ठिकाणी असताना दोघांमध्ये वाद झाला. मृतक जितेंद्र याने आरोपी दिनेश सदाफुले याला आई बहिणी वरून शिवीगाळ केली.

झोपेत असताना दगडाने ठेचले

याचाच राग मनात धरून दिनेशने जितेंद्र झोपला असताना त्याच्या डोक्यावर दगड टाकला. दगडाने ठेचून त्याची हत्या केली. हा सगळा प्रकार घडत असताना रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्हीमध्ये घटना दिसून आली. त्यामुळे आरपीएफचे जवान धावत घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत आरोपी हा दुसऱ्या गेटमधून निघाला. मात्र सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याचा पाठलाग केला. आरोपीला रेल्वे पोलिसांनी पकडले.

जितेंद्रला उपचारासाठी मेओ रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. आपसी वादातून आणि शिवीगाळ करण्यावरून ही हत्या झाल्याचं प्रथम दर्शनी पुढे आलं. अधिक तपास रेल्वे पोलीस करत आहेत, अशी माहिती जीआरपीचे पोलीस निरीक्षक मनीषा काशीद यांनी दिली.