AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : क्रूरतेला कळस, हाणामारीत मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीला फावड्याने मारहाण, सुन्न करणारा व्हिडीओ समोर

समाज जागृत होतोय, असं आपण बोलतो. पण विकृतपणा अद्यापही कमी होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून तर भयानक घटना समोर आली आहे.

VIDEO : क्रूरतेला कळस, हाणामारीत मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीला फावड्याने मारहाण, सुन्न करणारा व्हिडीओ समोर
क्रूरतेला कळस, हाणामारीत मध्यस्थी करायला गेलेल्या व्यक्तीला फावड्याने मारहाण, सुन्न करणारा व्हिडीओ समोर
| Edited By: Chetan Patil | Updated on: Aug 26, 2021 | 6:02 PM
Share

वर्धा : समाज जागृत होतोय, असं आपण बोलतो. पण विकृतपणा अद्यापही कमी होताना दिसत नाही. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरातून तर भयानक घटना समोर आली आहे. चार नराधम एका तरुणाला फावड्याने निर्घूणपणे मारहाण करत होते. यावेळी मध्यस्थीसाठी पडलेल्या एका व्यक्तीला आरोपींनी इतक्या अमानुषपणे मारहाण केली की तो जागेवर बेशुद्ध पडला. या घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे. विशेष म्हणजे भर दिवसा गजबजलेल्या परिसरात ही घटना घडली. घटनास्थळी असलेल्या लोकांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली.

नेमकं काय घडलं?

हिंगणघाट बस स्थानकाजवळ दत्त मंदिरसमोर बुधवारी (25 ऑगस्ट) सकाळच्या सुमारास संबंधित घटना घडली. आरोपी आदर्श गोलाईत, कुणाल लाजूरकर, सागर यादव, सोनू सोनकुसरे हे चौघे मिळून संदीप नावाच्या तरुणाला मारहाण करत होते. यावेळी वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी गेलेल्या व्यक्तीस चौघांनी लाठ्याकाठ्या तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करीत जखमी केले. ही घटना दत्त मंदिर परिसरात घडली. याप्रकरणी आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांनी दिली आहे.

जखमी दिलीपवर रुग्णालयात उपचार सुरु

दिलीप मारोती दानव हे मजुरीच्या कामावर जाण्यासाठी घरुन फावडे, घमिलं घेऊन कामावर जात असताना चौघे जण संदीप नामक युवकाला मारझोड करीत असल्याचे दिसून आले. संदीप ओळखीचा असल्याने दिलीप हे वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी गेले असता आदर्श गोलाईत, कुणाल राजुरकर, सागर यादव, हिमांशु सोनकुसरे यांनी दिलीपला तू मध्ये का आलास? असे म्हणून फावड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. जखमी दिलीप यांच्यावर हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आरोपींना बेड्या

याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपींविरोधात कठोर कारवाई केली. पोलिसांनी चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच आरोपींविरोधात कलम 326-34 अंतर्गत हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे.

घटनेचा थरार बघा :

हेही वाचा :

आई गळफास घेऊन पंख्याला लटकली, चिमुकले रडत बंगल्याबाहेर आले, जळगावातील मन हेलावणारी घटना

ओळखीचा होता, पैसे बघून नजर फिरली, दरोड्यासाठी ज्वेलर्स मालकाची हत्या करुन खाडीत फेकलं, हत्येचं गूढ अखेर समोर

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ