मॉर्निंग वॉकला जात असताना गोंदियात गॅरेज मालकावर गोळी झाडली, नंतर बंदूक तिथेच फेकून आरोपी पळाला, 24 तासात बेड्या, हत्येमागील गूढ नेमकं काय?

गोंदिया शहरात शनिवारी (21 ऑगस्ट) भर सकाळी आठ वाजता एका हत्येच्या घटनेने खळबळ उडाली. एका तरुण गॅरेज मालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली.

मॉर्निंग वॉकला जात असताना गोंदियात गॅरेज मालकावर गोळी झाडली, नंतर बंदूक तिथेच फेकून आरोपी पळाला, 24 तासात बेड्या, हत्येमागील गूढ नेमकं काय?
मॉर्निंग वॉकला जात असताना गोंदियात गॅरेज मालकावर गोळी झाडली

गोंदिया : गोंदिया शहरात शनिवारी (21 ऑगस्ट) भर सकाळी आठ वाजता एका हत्येच्या घटनेने खळबळ उडाली. एका तरुण गॅरेज मालकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे हल्लेखोराने गोळी झाडून तिथेच बंदूक फेकून धूम ठोकली होती. त्यामुळे या हत्येमागील गूढ आणखी वाढलं होतं. पण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत अवघ्या 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

कौशिक यांचा जागीच मृत्यू

संबंधित घटनेत एनसीसी गॅरेज मालक अशोक कौशिक यांचा जागीच मृत्यू झाला. कौशिक यांचा शहरात ट्रान्सपोर्टचा देखील व्यवसाय आहे. ते शनिवारी सकाळी जेव्हा मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले तेव्हा आपल्यासोबत काय घडेल याची कल्पना त्यांना देखील नव्हती. खरंतर कौशिक रोज नित्यनियमाने मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडायचे. हल्लेखोरांनी याच गोष्टीचा फायदा घेतला. त्यांनी योग्यवेळ साधत शनिवारी सकाळी रस्त्यात कौशिक यांच्या मानेवर बंदूक ठेवून गोळी झाडली. या हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या कौशिक यांचा जागीच मृत्यू झाला.

तीन आरोपींना बेड्या

कौशिक यांना गोळी झाडल्यानंतर हल्लेखोर हातातील बंदूक तिथेच फेकून पसार झाला. त्यामुळे या हत्येमागील गूढ आणखी वाढलं होतं. कारण हल्लेखोर स्वत:हून आपला पुरावा म्हणजे ज्या बंदुकीने गोळी झाडली ती त्याच परिसरात फेकून पसार झाला होता. त्याला त्यातून नेमकं काही सूचित करायचं होतं का? असाही प्रश्न यातून निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी या प्रकरणी तिघांना बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी तीन आरोपींना कसं पकडलं?

पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं? याबाबतची सविस्तर माहिती अद्याप आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही. पण पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत कारवाई केली. शनिवारी सकाळी घटनास्थळी कौशिक यांचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. कौशिक यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या प्रकरणी शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांना तपास करत असताना ज्या बंदुकीने कौशिक यांची हत्या झाली तीच बंदूक त्याच परिसरात सापडली. कदाचित तोच एक मोठाव पुरावा असावा, असा अंदाज आहे. पोलिसांनी तपासाचे सूत्र फिरवित तीन आरोपींना अखेर बेड्या ठोकल्या. सतिश बनकर, चिंटू शर्मा आणि दीपक भूते असे आरोपींचे नावे आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. कौशिक यांच्या हत्येमागे नेमकं काय कारण ते लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

सरकारी शाळा बनली डान्स बार, ज्ञान मंदिरात छमछम, लाजिरवाणी घटना

बॉयफ्रेण्डने दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधल्याचा राग, पुण्यात 22 वर्षीय तरुणीचा गळफास

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI