बॉयफ्रेण्डने दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधल्याचा राग, पुण्यात 22 वर्षीय तरुणीचा गळफास

बॉयफ्रेण्डने काहीही न सांगता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचं कळताच मनिषा निराश झाली होती. यातूनच तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

बॉयफ्रेण्डने दुसऱ्याच मुलीसोबत लग्नगाठ बांधल्याचा राग, पुण्यात 22 वर्षीय तरुणीचा गळफास
पुण्यात 22 वर्षीय तरुणीचा गळफास

पुणे : बॉयफ्रेण्डने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केल्यामुळे नैराश्यातून युवतीने आत्महत्या केली. पुण्यात 22 वर्षीय तरुणीने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मनिषा गोविंद गायकवाड असं 22 वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहत होती. गेल्या काही दिवसांपासून हडपसर भागात राहणाऱ्या 23 वर्षीय युवकासोबत तिचे प्रेमसंबंध होते. याविषयी तरुणाच्या आई वडिलांनाही माहिती असल्याचा दावा केला जातो.

राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या

बॉयफ्रेण्डने काहीही न सांगता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केल्याचं कळताच मनिषा निराश झाली होती. यातूनच तिने आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. या प्रकरणी मनिषाच्या वडिलानी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

प्रियकराच्या आई-वडिलांवरही गुन्हा

पोलिसांनी आरोपी प्रियकरासह त्याच्या आई-वडिलांवरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

पत्नीच्या प्रियकराचा हत्येच्या नादात प्राण गमावले

दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील पतीला आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय होता. पत्नीच्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी त्याने मांत्रिकाचा आधार घेतला. मात्र या नादात पतीलाच आपले प्राण गमवावे लागले. मांत्रिकाच्या भेटीवेळी ओळख झालेल्या एका व्यक्तीनेच या पतीची हत्या केली.

हमीरपूरमधील एका बड्या मांत्रिकाकडे जाण्याचं मांत्रिकाकडे भेटलेल्या शैलेंद्रने पती नीरजला सुचवलं. पत्नीच्या प्रियकरापासून मुक्ती मिळवण्यासाठी नीरज घायकुतीला आला होता. तो त्यासाठी तयार झाला. मात्र शैलेंद्रने वेगळाच प्लॅन आखला होता. मांत्रिकाला भेटवण्याच्या बहाण्याने हमीरपूरच्या जंगलात नेऊन त्याची हत्या केली.

संबंधित बातम्या :

वॉचमनला मारहाण करुन घरफोड्या, सीसीटीव्हीत कैद झालेली टोळी अंबरनाथमध्ये कशी सापडली?

बायकोचे आंघोळ करतानाचा व्हिडीओ पाठवले, भावोजींकडून धमकावून बलात्कार

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI