वॉचमनला मारहाण करुन घरफोड्या, सीसीटीव्हीत कैद झालेली टोळी अंबरनाथमध्ये कशी सापडली?

सीसीटीव्हीत कैद होऊनही चोरटे बिनधास्तपणे नव्या चोऱ्या करत असल्यानं एक प्रकारे पोलिसांनाच हे चोरटे आव्हान देत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

वॉचमनला मारहाण करुन घरफोड्या, सीसीटीव्हीत कैद झालेली टोळी अंबरनाथमध्ये कशी सापडली?
अंबरनाथमध्ये चोरी करणारे जेरबंद

अंबरनाथ : अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत मागील अनेक दिवसांपासून घरफोड्या करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात अखेर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांना यश आलंय. त्यांच्या चौकशीत शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन गुन्हे उघडकीला आले आहेत.

काय आहे प्रकरण?

अंबरनाथ शहराला लागून असलेल्या आनंदनगर एमआयडीसीत मागील काही दिवसात सातत्यानं चोऱ्या, घरफोड्या होत होत्या. या घटना सीसीटीव्हीत कैद होऊनही चोरटे बिनधास्तपणे नव्या चोऱ्या करत असल्यानं एक प्रकारे पोलिसांनाच हे चोरटे आव्हान देत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

वॉचमनला मारहाण करत चोरी

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेसटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 5 ऑगस्ट रोजी अशीच घरफोडी झाली होती. 8 ते 10 जणांच्या टोळीने कंपनीत प्रवेश करत वॉचमनला मारहाण करत बांधून ठेवलं आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबला. यानंतर कंपनीतील तांब्याच्या वायर्स आणि अन्य साहित्य असा 1 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

पाच जणांना अटक

यानंतर पोलिसांनी चोरट्यांचा मग काढत आकाश वळवे, मनोज वाघे, संदीप वाघे, काशीनाथ वाघे आणि सुनील वळवे या 5 जणांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 गुन्ह्यांची उकल केली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरलेला 71 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

दुसऱ्या गुन्ह्याचीही उकल

तर दुसऱ्या गुन्ह्यातील 60 किलो तांब्याच्या वितळवलेल्या लगडी जप्त करण्यात आल्या. या चोरट्यांचे आणखी काही साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या सर्वांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का? याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

पुण्यात हडपसरमध्ये बंगल्यात चोरी, 155 तोळे सोन्यासह 88 लाखांचा ऐवज चोरीला

नागपुरातील तरुणाचा चोरीचा अनोखा फंडा, ऑनलाईन ऑर्डर, डिलिव्हरी बॉय आल्यावर पाच मिनिटात अफरातफर, नंतर वस्तू परत

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI