Nagpur Crime : सट्ट्यामुळे कर्जबाजारी झाले, मग उधारी चुकवू न शकल्याने व्यापाऱ्यांना थेट…

दोघे तरुण व्यापारी अचानक बेपत्ता झाले. पोलीस दोघांचा शोध घेत होते. पण शोध सुरु असतानाच जे समोर आलं त्याने कुटुंबीयांना धक्काच बसला.

Nagpur Crime : सट्ट्यामुळे कर्जबाजारी झाले, मग उधारी चुकवू न शकल्याने व्यापाऱ्यांना थेट...
उधारीच्या पैशाच्या वादातून दोघा व्यापाऱ्यांना संपवले
| Edited By: | Updated on: Jul 27, 2023 | 12:04 PM

नागपूर / 27 जुलै 2023 : उधारीच्या पैशाच्या वादातून दोन तरुण व्यापाऱ्यांचे अपहरण करत त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. हत्या करुन दोन्ही मृतदेह नदीत टाकण्यात आले होते. दोन्ही मृतदेह नदीतून बाहेर काढून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सिताबर्डी पोलीस आणि सोनेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. पोलीस तपासाअंतीच हत्या नेमकी कुणी केली? आणि नक्की पैशाच्या वादातूनच हत्या झाली की अन्य कारणातून याबाबत माहिती मिळेल.

दोघेही बेपत्ता होते, मग मृतदेहच आढळले

दोन्ही मयत व्यापारी अचानक बेपत्ता झाले होते. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी सिताबर्डी पोलीस आणि सोनेगाव पोलिसात मिसिंगची तक्रार दाखल केली होती. पोलीस दोन्ही बेपत्ता व्यापाऱ्यांचा शोध घेत होते. मात्र आज सकाळी तळेगाव येथील नदीपात्रात दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.

उधारीच्या पैशातून हत्याचा झाल्याची प्राथमिक माहिती

दोघा व्यापाऱ्यांना सट्टा खेळण्याचा नाद होता. सट्ट्यासाठी त्यांनी आरोपींकडून उधार पैसे घेतले होते. मात्र हे पैसे परत न करु शकत नसल्याने आरोपींनी आधी त्यांचे अपहरण केले. मग गोळ्या झाडून हत्या केली आणि मृतदेह तळेगाव येथील नदीपात्रात फेकल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात मिळाली. मात्र नक्की याच कारणातून ही हत्या झाली की अन्य कारण आहे? याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. पोलिसांनी अज्ञात आरोपींचाही शोध सुरु केला आहे.