बंद पडलेल्या ट्रकवर धडकून बाईक अडकली, वर्ध्यात भीषण अपघात, दोघांचा जागीच अंत

| Updated on: Feb 17, 2022 | 10:43 AM

भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा जिल्ह्यातील पुलगाव रसुलाबाद मार्गावरील हिवरा शिवारात घडला.

बंद पडलेल्या ट्रकवर धडकून बाईक अडकली, वर्ध्यात भीषण अपघात, दोघांचा जागीच अंत
वर्ध्यात बाईक आणि ट्रकचा भीषण अपघात
Follow us on

वर्धा : बाईक ट्रकवर आदळून दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू (Bike Accident) झाला. वर्धा जिल्ह्यात ही काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. यामध्ये दोघाही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. दोघे जण दुचाकीने रसुलाबादच्या दिशेने जात होते. यावेळी हिवरा शिवारात पोहोचले असताना बाईक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर (Wardha Truck Accident) धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यांची बाईक ट्रकमध्ये अडकली, तर दोघाही तरुणांना घटनास्थळीच प्राण गमवावे लागले. अपघात झालेल्या ठिकाणी रक्ताचे थारोळे झाले होते.

नेमकं काय घडलं?

भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात वर्धा जिल्ह्यातील पुलगाव रसुलाबाद मार्गावरील हिवरा शिवारात घडला.

बाईकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक

सचिन कनेरी (वय 30 वर्ष) आणि सुरज ढोले (वय 25 वर्ष) (दोघेही राहणार रसुलाबाद) अशी मृतांची नावे आहे. नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. तर सचिन आणि सूरज हे दोघे दुचाकीने रसुलाबादच्या दिशेने जात होते. दुचाकी हिवरा शिवारात येताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन थेट उभ्या ट्रकवर आदळले.

या धडकेत सचिन आणि सुरज यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकमध्ये अडकली होती. या प्रकरणी पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.

संबंधित बातम्या :

CCTV | कारच्या धडकेत बाईकस्वार 200 मीटरपर्यंत फरफटत गेला, 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू, अल्पवयीन कार चालक ताब्यात

CCTV | भरधाव रिक्षा अचानक रस्त्यात घसरली, सात वर्षांच्या चिमुकलीसह चौघं जखमी

कंटेनर गेटला घासत नाही ना? ड्रायव्हर उतरताच गाडी अचानक पुढे, गेटमध्ये अडकून जागीच मृत्यू