VIDEO | बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या प्रेमी युगुलाला मारहाण, अकोल्यात संतापजनक प्रकार

अकोल्यातील उरल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गायगा पेट्रोल डेपोजवळ प्रेमी युगुल बर्थडे साजरा करण्यासाठी जात असताना पेट्रोल डेपो जवळील नागरिकांनी दोघा जणांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

VIDEO | बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या प्रेमी युगुलाला मारहाण, अकोल्यात संतापजनक प्रकार
अकोल्यात प्रेमी युगुलाला स्थानिकांची मारहाण
| Edited By: | Updated on: Dec 13, 2021 | 12:56 PM

अकोला : बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेलेल्या प्रेमी युगुलाला स्थानिक रहिवाशांनी मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील ही घटना मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

प्रेमी युगलांना शहराबाहेर वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणं खूप महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे. अकोल्यातील उरल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गायगा पेट्रोल डेपोजवळ प्रेमी युगुल बर्थडे साजरा करण्यासाठी जात असताना पेट्रोल डेपो जवळील नागरिकांनी दोघा जणांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

या प्रेमी युगुलाला मारहाण केल्याची घटना एका व्यक्तीने मोबाईलमध्ये कैद केली. हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वांकडून या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. तर या सर्व घडलेल्या प्रकाराची अद्यापपर्यंत कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

30 वर्षीय महिलेचा डोकं उडवलेला नग्न मृतदेह, माथेरानच्या लॉजमधील हत्याकांडाचे धागे गोरेगावपर्यंत कसे पोहोचले?

बोरीपाडा आश्रमशाळेत 9 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; अभ्यास बुडू नये म्हणून वसतिगृहात ठेवले अन्…

नात्याला कलंक लावणारी घटना ; सात वर्षाच्या पुतणीसोबत काकाच करत होता ‘हे’ कृत्य