AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सिगरेटच्या थोटकावरुन आरोपीचा शोध, पत्नीच्या हत्येप्रकरणी 61 वर्षीय पतीची जन्मठेप कायम

हत्येवेळी आपण घरी उपस्थित नव्हतो, असा बनाव आरोपीने केला होता. पोलिसांनी घटनेनंतरच्या पंचनाम्यात आरोपीने वापरलेले सिगरेटचे थोटुक जप्त केले होते. आरोपीच्या कपड्यांवरील डाग आणि सिगरेट थोटुकाच्या रासायनिक पृथक्करणानंतर आरोपीची उपस्थिती सिद्ध झाली होती

सिगरेटच्या थोटकावरुन आरोपीचा शोध, पत्नीच्या हत्येप्रकरणी 61 वर्षीय पतीची जन्मठेप कायम
बल्लारपूर पोलीस स्टेशन
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 30, 2021 | 7:46 AM
Share

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातल्या एका हत्या प्रकरणात सिगरेटच्या थोटकावरून आरोपी सापडला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. जून 2015 मध्ये आरोपीने स्वतःच्या पत्नीचा डोक्यात काठी घालून खून केला होता.

काय आहे प्रकरण?

हत्येवेळी आपण घरी उपस्थित नव्हतो, असा बनाव आरोपीने केला होता. पोलिसांनी घटनेनंतरच्या पंचनाम्यात आरोपीने वापरलेले सिगरेटचे थोटुक जप्त केले होते. आरोपीच्या कपड्यांवरील डाग आणि सिगरेट थोटुकाच्या रासायनिक पृथक्करणानंतर आरोपीची उपस्थिती सिद्ध झाली होती. आरोपी रमेश जावळे (वय 61 वर्ष) याची जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी कायम ठेवली.

नेमकं काय घडलं होतं?

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातल्या एका हत्या प्रकरणात सिगरेट थोटकावरून आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला होता. जून 2015 मध्ये आरोपीने स्वतःच्या पत्नीचा डोक्यात काठी घालून खून केला होता. चारित्र्याच्या संशयावरून घडलेल्या या हत्येनंतर घटनेच्या वेळी आपण घरी उपस्थित नव्हतो, असा जबाब आरोपीने दिला होता.

जन्मठेपेची शिक्षा कायम

पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात महिलेच्या डोक्यात घातलेली- रक्ताचे डाग असलेली काठी, रक्ताचे डाग असलेले आरोपीचे कपडे यासह आरोपीने ओढून विझवलेले सिगरेटचे थोटुक जप्त केले होते. 2018 साली चंद्रपूर सत्र न्यायालयाने या पुराव्यांच्या आधारे आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली होती. नागपूर उच्च न्यायालयाने देखील आरोपीच्या कपड्यांवरील डाग आणि सिगरेट थोटुकाच्या रासायनिक पृथक्करणानंतर आरोपीची उपस्थिती सिद्ध झाल्याचे सांगत आरोपी रमेश जावळे याची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे.

विरारमध्ये क्षुल्लक कारणावरुन पत्नीची हत्या

दरम्यान, घराजवळ कपडे वाळत घालण्यावरुन शेजाऱ्यांशी चाललेल्या वादात साथ न दिल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबईजवळच्या विरार पूर्व भागात राहणाऱ्या 28 वर्षीय विवाहितेची पतीनेच हत्या केल्याचा प्रकार काल उघडकीस आला होता. त्यानंतर चौकशीदरम्यान हत्येचं चक्रावून टाकणारं कारण समोर आलं आहे. पतीने रविवारी रात्री माहेरी येऊन केलेल्या हल्ल्यात पत्नीला प्राण गमवावे लागले, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. आरोपी पतीचा शोध सुरु आहे.

विरारमधील कॉम्प्लेक्समध्ये थरार

मयत सुप्रिया जगदिश गुरव (वय 28 वर्ष) आणि तिचा पती जगदिश हे वसई रेल्वे स्थानकाबाहेर तिकीट विक्री करणाऱ्या एका खासगी कंपनीत काम करत होते. सुप्रियाची 47 वर्षीय आई सुषमा शेट्टी यांच्या राहत्या घरी रविवारी रात्री 9 वाजता हा प्रकार घडला. सुषमा शेट्टी विरारमधील नरेंद्र ब्रह्म कॉम्प्लेक्समध्ये पहिल्या मजल्यावरील रूम नंबर 106 मध्ये राहतात. तर जावई जगदिश आणि मुलगी सुप्रिया जवळच भाड्यावर घर घेऊन राहतात.

शेजाऱ्यांसोबत वाद

जगदिशच्या घरासमोर त्यांच्या शेजाऱ्यांनी कपडे वाळत घातल्यामुळे दोघांचा मोठा वाद झाला. यावेळी जगदिशने माहेरी गेलेल्या सुप्रियाला फोन केला आणि भांडण्यासाठी बोलावलं. मात्र कामात व्यस्त असल्यामुळे तिने घरी येण्यास नकार दिला. बायकोने दिलेल्या नकारामुळे जगदिशचा पारा चढला आणि तो तडक तिच्या माहेरी येऊन थडकला.

बायकोला भोसकलं, सासूवरही वार

तिथे येऊन त्याने बायको आणि सासूला शिवीगाळ केली. सासूने त्याला प्रत्युत्तर केलं असता जावई जगदिशने तिचं डोकं भिंतीवर आपटलं. हे पाहून सुप्रियाने जगदिशला ढकललं. मात्र जगदिशने स्वयंपाकघरात जाऊन चाकू आणला आणि तिच्या छातीत खुपसला. सासूने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तिच्याही हातावर सुरीने वार केले आणि तो घटनास्थळावरुन पसार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सासू गंभीर जखमी

मायलेकीचा आरडाओरडा ऐकून त्यांचे शेजारी धावत आले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सुप्रिया आणि सुषमा या दोघींना जवळच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र डॉक्टरांनी सुप्रियाला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. तर सुषमाला संजीवनी हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

आरोपी पतीला दारुचे व्यसन

2020 मध्ये पतीच्या निधनानंतर सासू सुषमा शेट्टी घरकाम करतात. सुप्रिया, जगदिश आणि त्यांची तीन मुलं आधी त्यांच्यासोबतच राहत होती. मात्र नंतर ते भाड्याच्या खोलीत राहायला गेले. जावई जगदिश दारुच्या आहारी गेल्याची माहितीही सुषमा यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात दिली. विरार पोलीस ठाण्यात कलम 302 प्रमाणे हत्येचा गुन्हा दाखल केला असून, आरोपी पतीच्या शोधासाठी 2 विशेष पथके तयार करून रवाना केले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

कपडे वाळत घालण्याचा वाद, शेजाऱ्यांशी भांडायला बायको आली नाही, नवऱ्याने माहेरी जाऊन भोसकलं

पाच मुलांच्या आईचा तरुणावर जडला जीव, प्रियकराच्या साथीने पतीची हत्या

प्रियकराच्या साथीने पतीची हत्या, मुलीने पोलिसांना सांगितलं बाबांना किचनमध्ये पुरलंय!

Follow Us
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
नवीन नियम लागू! ST बसमध्ये सवलत हवी असेल तर आता हे कार्ड अनिवार्य
पप्या शिंदे खंडणी विरोधी पथकात, आईची पहिली प्रतिक्रिया समोर; पुरणेकर..
Pradeep Purnekar Case | अटकेत असलेला आरोपी पप्या शिंदेला खंडणी विरोधी पथकात आणलं, आता...
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन नंतर 7 ऑक्टोंबरला थेट..
ठाकरे गट मोठ्या तयारीत! 4 ऑक्टोबरला आंदोलन आणि 7 ऑक्टोंबरला थेट...
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमारांविरोधात CJP आक्रमक; मुंबईत उद्या जेलभरो आंदोलनाचा इशारा!
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा