नागपुरात सैन्यातील जवानाकडे सोन्याचं बिस्कीट सापडलं, धड उत्तर देईना, मग RPF जवानांनी…

आरपीएफ जवानांना याविषयी गुप्त माहिती मिळाली होती. युवकाची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळालं नाही, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.

नागपुरात सैन्यातील जवानाकडे सोन्याचं बिस्कीट सापडलं, धड उत्तर देईना, मग RPF जवानांनी...
नागपुरात जवानाकडे सोन्याचं बिस्कीट
| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 10:00 AM

नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाकडे सोन्याचे बिस्कीट सापडल्याने खळबळ उडाली. 100 ग्रॅम वजनाचे सोने आणि 2 लाख 63 हजार रुपयांची रोकड त्याच्याकडे आढळली. विशेष म्हणजे हा प्रवासी सैन्यातील जवान असल्याची प्राथमिक माहिती आहे.

काय आहे प्रकरण?

आरपीएफ जवानांच्या तपासणीत ही बाब समोर आली. विशाखापट्टणम-नवी दिल्ली रेल्वे गाडीने संशयित तरुण प्रवास करत होता. आरपीएफ जवानांना याविषयी गुप्त माहिती मिळाली होती. युवकाची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळालं नाही, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.

जवानाकडे काय काय सापडलं?

संशयिताकडे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट आणि 2 लाख 63 हजार रुपयांची रोकड आढळली आहे. मुद्देमालासह संशियत आरोपीला आयकर विभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे.

ना धड उत्तर, ना कागदपत्रं

संशयित हा सैन्यातील जवान असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र त्याच्याकडे सोन्याचे बिस्कीट कुठून आले, ते मूळ कोणाचे आहे याचे उत्तर आणि कागदपत्रं नसल्याने कारवाई करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

बॉयलरची सफाई करताना हलगर्जी, पुण्यात उकळतं पाणी पडून चौघे भाजले, एकाचा मृत्यू

ट्रॅक्टर-कारची भीषण धडक, दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरासमोरच होमगार्ड तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, नागपुरात उपचार