AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपुरात मायलेकीच्या हत्येने खळबळ, विवाहितेचा गळा आवळला, अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचलं

पती-पत्नीमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा संशय आहे. पत्नीसोबतच 10 वर्षीय मुलीचाही त्याने दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे.

नागपुरात मायलेकीच्या हत्येने खळबळ, विवाहितेचा गळा आवळला, अल्पवयीन मुलीला दगडाने ठेचलं
नागपुरात मायलेकीची हत्या
| Edited By: Anish Bendre | Updated on: Sep 28, 2021 | 12:22 PM
Share

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर परिसरात दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिलेची गळा आवळून, तर 10 वर्षीय मुलीची दगडाने ठेचून हत्या करुन आरोपी फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

कळमेश्वर परिसरातील झुणकी मार्गावर श्रावण घोडपागे यांचं शेत आहे. त्यांनी ते शेत भाड्याने दिलं आहे. ज्यांना शेत देण्यात आलं आहे, त्यांनी शेतात काम करण्यासाठी मध्य प्रदेशमधील एका कुटुंबाला नोकरीसाठी ठेवलं होतं. राकेश साहू हा पत्नी आणि 10 वर्षीय मुलीसोबत शेतातच झोपडी टाकून राहत होता.

नेमकं काय घडलं?

पती-पत्नीमध्ये काहीतरी वाद झाला आणि त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याचा संशय आहे. पत्नीसोबतच 10 वर्षीय मुलीचाही त्याने दगडाने ठेचून हत्या केल्याचा आरोप आहे.

आरोपी पसार, शोध सुरु

आरोपी राकेश साहू पसार झाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत चौकशी सुरु केली आहे. आरोपीचा शोध घेतला जात असून या घटनेमुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

मीरा रोडमध्ये आई आणि दोन मुलांचे मृतदेह

दरम्यान, मीरा रोडच्या नरेंद्र पार्क परिसरातील एकाच घरात तिघांचे मृतदेह आढळल्याने काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. आई, मुलगा आणि मुलगी यांचे मृतदेह राहत्या घरात सापडले होते. मुंबई जवळच्या मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली होती. एकाच कुटुंबातील तिघांच्या संशयास्पद मृत्यूने चिंतेचं वातावरण पसरलं आहे. आई नसरीन वाघू (वय 47 वर्ष), मुलगी सदाद नाझ (21 वर्ष) आणि 13 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला आहे.  मुलगा आणि मुलगी दोघे गतिमंद असल्याची माहिती समोर आली होती.

कल्याणमध्ये महिलेची हत्या, पतीवर संशय

दुसरीकडे, कल्याणच्या हाय प्रोफाईल गांधारी परिसरात दिवसाढवळ्या एका घरकाम करणाऱ्या महिलेचा मृतदेह आढळल्याने काही दिवसांपूर्वी एकच खळबळ उडाली होती. कल्याण पश्चिमेतील हाय प्रोफाईल गांधारी परिसरात रिंग रोड रस्त्याचे काम सुरु आहे. या रस्त्यावर एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मयत महिलेचे नाव लक्ष्मी मोहिते होते. लक्ष्मीची हत्या दगडाने ठेचून करण्यात आली होती. ती त्याच परिसरात घरकाम करत असे. लक्ष्मी ही भिवंडीतील सावद गाव परिसरात राहत होती. लक्ष्मीची हत्या तिचा पती जर्नादन मोहिते याने केल्याचा आरोप झाला होता.

संबंधित बातम्या :

मायलेकीसह अल्पवयीन मुलगा राहत्या घरी मृतावस्थेत, मीरा रोडमध्ये खळबळ

28 वर्षीय पत्नीसह एक वर्षाच्या मुलाची हत्या, पुण्यात पतीची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोना झाल्याच्या रागातून पत्नीची हत्या, स्टेशन मास्तर पतीची आत्महत्या

Follow Us
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
दुष्काळाची झळ! नागपूरचं संत्रा मार्केट ओस पडलं, 70 टक्के उत्पादन घटलं
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा